सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, ७ मार्च, २०२३

दिनविशेष १८ एप्रिल

 

दिनविशेष १८ एप्रिल  

दिनविशेष १८ एप्रिल

१८ एप्रिल :


महत्त्वाच्या घटना:

१३३६: दक्षिणेमध्ये विजयनगर हिंदू राज्याची स्थापना झाली.

१३३६: हरिहर व बुक्‍क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली.

१७०३: औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.

१७२०: शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना कर्‍हाडनजीक मसूर येथे पेशवाईची वस्त्रे मिळाली.

१८३१: ’यूनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा’ ची स्थापना झाली.

१८५३: मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.

१८९८:  जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी

१९१२: टायटॅनिकमधील वाचलेले ७०५ प्रवासी घेउन आर.एम.एस. कार्पेथिया जहाज न्यूयॉर्कला पोचले.

१९२३: पुण्याच्या शिवाजी मंदिरात शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संगमरवरी अर्धपुतळ्याची स्थापना. हा राज्यातील पहिला शिवपुतळा. या पुतळ्याचे अनावरण मंदिराचे देणगीदार दिवंगत गणेश गोखले यांचे चिरंजीव डॉक्टर महादेव गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.

१९२४: सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले.

१९३०: क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.

१९३०: आज काहीही बातमी नाही असे बी. बी. सी. या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले.

१९३६: पेशव्यांची राजधानी असणार्‍या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.

१९५०: आंध्र प्रदेशातील तेलंगणा येथील पोचमपल्ली खेड्यातील ८० एकर जमीनीच्या भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.

१९५४: गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.

१९७१: एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान ’सम्राट अशोक’ शाही दिमाखात सकाळी ८-२० वाजता सांताक्रूझ विमानतळावर दाखल.

२००१: भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक (GSLV- D1) वाहकाचे रशियन बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाच्या साहाय्‍याने श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा