सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, ७ मार्च, २०२३

दिनविशेष १९ एप्रिल

 

दिनविशेष १९ एप्रिल  

दिनविशेष १९ एप्रिल

१९ एप्रिल :


महत्त्वाच्या घटना:

१४५१: मुघल सुलतान बहलोल लोदी यांनी दिल्लीवर आपला राज्यभिषेक केला. दिल्लीच्या शासक पदी जाणारे ते पहिले अफगाण सुलतान होते

१५२६: मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मोगलसत्तेचा पाया घातला.

१५८७: सर फ्रांसिस ड्रेकने केडिझच्या बंदरात स्पेनच्या आरमाराचा पराभव केला.

१७७०: ब्रिटीश खोजकर्ता, नाविक, मानचित्रकार आणि रॉयल नेवीचे कप्तान जेम्स कुक ऑस्ट्रेलिया देशांत जाणारे पहिले व्यक्ती बनले.

१७७५: अमेरिकन क्रांती – कॉँकॉर्ड व लेक्झिंग्टनची लढाई.

१८१०: व्हेनेझुएलाने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले.

१८३९: १८३९चा लंडनचा तह – बेल्जियम स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्त्वात.

१९०४: कॅनडातील टोरोंटो शहर आगीत भस्मसात.

१९०९: जोन ऑफ आर्कला संत घोषित करण्यात आले.

१९१९: अमेरिकेच्या लेस्ली अर्विनने सर्वप्रथम पॅराशुटच्या सहाय्याने विमानातून उडी मारली.

१९३६: पॅलेस्टाईनमध्ये उठाव.

१९४५: सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९४८: ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९५६: गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.

१९६०: दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्ष सिंगमन र्‍ही विरुद्ध विद्यार्थ्यांची निदर्शने.

१९६१: पिग्सच्या अखातातील आक्रमण – घुसखोरांचा पराभव.

१९७१: सियेरा लिओन प्रजासत्ताक झाले. सियाका स्टीवन्स राष्ट्राध्यक्षपदी.

१९७१: रशियाने सर्वप्रथम मानवनिर्मित अंतराळस्थानक सॅल्युत १चे प्रक्षेपण केले.

१९७५: एक्स-रे खगोलशास्त्र, वैमानिकी आणि सौर भौतिकी येथे प्रयोग करण्यासाठी  भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) तयार केलेला पहिला भारतीय उपग्रह आर्यभट याचे प्रक्षेपण करण्यात आले.

१९७८: लागुमॉट हॅरिस नौरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.

१९८९: यु.एस.एस. आयोवा या अमेरिकेच्या युद्धनौकेवर स्फोट. ४७ ठार.

१९९३: वेको, टेक्सास येथे ब्रांच डेव्हिडीयनच्या इमारतीस आग. ८१ ठार.

१९९५: ओक्लाहोमा सिटी येथे आल्फ्रेड पी. मरा फेडरल बिल्डींग मध्ये अमेरिकन अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवला. १६८ ठार.

१९९९: जर्मनीची संसद परत बर्लिन येथे.

२०००: एर फिलिपाईन्सचे बोईंग ७३७ जातीचे विमान दाव्हाओ आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३१ ठार.

२००५: जोसेफ रॅट्झिंगर पोप बेनेडिक्ट सोळावा या नावाने पोपपदी.

२००६: अमेरिकन अंतराळ यात्री नील आर्मस्ट्रॉंग यांनी आणलेला चंद्राचा तुकडा त्यांना भेट देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा