कोल्ह्याची
फजिती
एकदा एक कोल्हा आणि मांजर शिकारी कुत्र्या बद्दल बोलत होते.
कोल्हा म्हणाला, "मला शिकारी कुत्र्यांच्या खूप राग येतो."
"मलाही
येतो." मांजर म्हणाली.
कोल्हा म्हणाला, "ते खूप वेगाने धावतात. पण ते मला पकडू शकत
नाहीत. मला त्यांच्यापासून दूर पळण्याच्या अनेक युक्त्या माहित आहेत."
"तू कोण
कोणत्या युक्त्या करतोस?" मांजरीने विचारले.
"अनेक
युक्त्या!" कोल्हा फुशारकी मारत म्हणाला, "कधी मी
काटेरी झुडपातून धावतो. कधीकधी जंगलातल्या दाठ झुडपात जाऊन बसतो. तर कधी मोठ्या
बिळात लपून बसतो. अशा अनेक युक्त्या माझ्याकडे आहेत."
मांजर म्हणाली,"मला तर फक्त एक चांगली युक्ती माहित आहे."
"अरेरे! फक्त एकच युक्ती? ती कोणती आहे?"
कोल्हाने विचारले.
"बघच आता!
आता मी तीच युक्ती करणारच आहे. ते पहा, शिकारी कुत्रे इकडेच
येत आहेत. " असे म्हणत मांजर जवळच्याच एका झाडावर चढून बसली. तिथे ती शिकारी कुत्र्यापासून
अगदी सुरक्षित राहिली.
शिकारी कुत्र्यांनी कोल्ह्याचा पाठलाग सुरू केला. कोल्हा एकामागून एक
युक्त्या वापरत होता. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेरीस शिकारी
कुत्र्यांनी त्या कोल्ह्याला पकडले आणि ठार मारले.
मांजर मनात म्हणाली,. "बिचारा कोल्हा! त्याच्या अनेक युक्त्या
पेक्षा माझी एकच युक्ती चांगली होती."
तात्पर्य : कोणत्याही एकाच विषयात प्रवीण व्हा, नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या.
जाहिरात बंद करा
उत्तर द्याहटवा