दिनविशेष २१ मार्च
२१ मार्च :
महत्त्वाच्या घटना:
१५५६: ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणार्या आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.
१६८०: छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड जिल्ह्यातील कुलाबा किल्ल्याची बांधणी सुरु केली.
१८३६: कोलकाता येथील राष्ट्रीय लायब्ररी( वाचनालय) नावाने प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक पुस्तकालयाची स्थापना करण्यात आली.
१८५८: साली इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई राहत असलेल्या किल्ल्याला वेढा दिला होता.
१८७१: ऑटो व्हॉन बिस्मार्क हे जर्मनीचा चॅन्सेलर बनला.
१८८७: मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली.
१९३५: शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.
१९७५: सर्वप्रथम राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी इंदिरा गांधी यांच्या विनंतीवरून कलम ३५२ अंतर्गत मध्यरात्री आणीबाणी जाहीर केली होती. सन १९७७ साली भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
१९७७: भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
१९८०: अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.
१९९०: नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९९२: भारताची ‘शंकूल’ ही दुसरी पाणबुडी नौदलात सामील झाली
रात्र-दिवस समान असणारा दिवस आहे
२०००: फ्रेंच गयानातील कोअरु येथून एरियन ५०५ या वाहकाद्वारे भारताचा इन्सॅट ३ बी हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.
२००३: जळगाव महानगरपालीकेची स्थापना.
२००६: सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.
२०१२: आंतरराष्ट्रीय वन दिन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा