दिनविशेष १० एप्रिल
१० एप्रिल :
महत्त्वाच्या घटना:
१८७५: स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.
१८७५: महर्षी स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.
१८८९: भारतीय कलाविष्कार,जिम्नॅस्ट, बलूनिस्ट, पॅराशूटिस्ट आणि देशभक्त रामचंद्र चटर्जी गरम फुग्यातुन उड्डाण करणारे तसचं, पॅराशूटमध्ये उतरणारे पहिले भारतीय नागरिक ठरले.
१९१२: इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातुन ’टायटॅनिक’ जहाजाचे पहिल्या (व शेवटच्या) सफरीवर प्रयाण.
१९१७: गांधी चंपारण्याला आगमन
१९५५: योहान साल्क या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम पोलिओ लशीची यशस्वी चाचणी केली.
१९७०: पॉल मेकार्टनीने व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणास्तव द बीटल्स सोडण्याचे जाहीर केले.
१९८२: भारताचा पहिला उपग्रह इन्सॅट वन याचे अंतराळात उड्डाण.
२००१: भारत व इराण या दोन देश दरम्यान तेहरान घोषणा पात्रांवर हस्ताक्षर करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७५५: डॉ. सामुएल हानेमान, होमिओपॅथीचे जनक.
१८४३: रामचंद्र भिकाजी गुंजीकर – ’मोचनगड’ या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि ’विविध ज्ञानविस्तार’ मासिकाचे संपादक (मृत्यू: १८ जून १९०१)
१८४७: जोसेफ पुलित्झर – हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, वृत्तपत्र क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणार्यांना देण्यात येणार्या पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक (मृत्यू: २९ आक्टोबर १९११)
१८८०: सर सी. वाय. चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री (मृत्यू: १ जुलै १९४१)
१८९४: घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती.
१८९४: घनश्यामदास बिर्ला – व्यापारी पार्श्वभूमीतून पुढे येऊन पुढे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभारलेले उद्योगपती (मृत्यू: ११ जून १९८३)
१८९७: भारतीय लेखापाल आणि राजकारणी प्रफुल्लचंद्र सेन यांचा जन्म. (मृत्यू: २५ सप्टेंबर १९९०)
१९०१: डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु (मृत्यू: ३ मे १९७१)
१९०७: मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर – नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार (मृत्यू: १ फेब्रुवारी १९९५)
१९१७: भारतीय राजकारणी जगजितसिंह लयलपुरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे २०१३)
१९२७: मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ. तार्यांची प्रत आणि त्यांच्या वर्णपटातील परस्परसंबंधांची उकल केली. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८२)
१९२८: परमवीर चक्र सन्मानित भारतीय सैन्य दलाचे माजी लेफ्टनंट कर्नल धनसिंग थापा यांचा जन्मदिन.
१९३१: किशोरी आमोणकर – शास्त्रीय गायिका
१९३५: भारतीय जयपूर घराण्याचे शास्त्रीय गायीका, शास्त्रीय शैली ख्याल आणि हलकी शास्त्रीय शैली ठुमरी आणि भजन गानसम्राज्ञी किशोरी रवींद्र आमोणकर यांचा जन्मदिन.
१९५२: भारतीय राजकारणी नारायण राणे यांचा जन्म.
१९७२: स्काईप चे सहसंस्थापक प्रेसिंड कासासुलु यांचा जन्म.
१९७५: भारतीय नर्तक आणि कोरिओग्राफर टेरेंस लुईस यांचा जन्म.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा