दिनविशेष ९ एप्रिल
९ एप्रिल :
महत्त्वाच्या घटना:
१६६९: मुघल शासक औरंगजेब यांनी आपल्या सैनिकांना हिंदुची सर्व धार्मिक स्थळे, मंदिर, शाळा उध्वस्त करण्यास सांगितले.
१८६०: फ्रेंच देशातील प्रकाशक, पुस्तक विक्रेता आणि शोधक एडुअर्ड-लिओन स्कॉट डी मार्टिनविले यांनी सर्वप्रथम मानवी आवाजाचे ध्वनीमुद्रण केलं.
१८६७: रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत ’एक’ मताने मंजुरी मिळाली.
१९४०: दुसरे महायुद्ध : जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.
१९५३: वॉर्नर बंधूंचा पहिला त्रिमितीय (3 D) चित्रपट, हाऊस ऑफ वॅक्स, प्रदर्शित झाला.
१९६७: बोइंग-७६७ ने पहिले उड्डाण केले.
१९९४: सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना ’आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
१९९५: लता मंगेशकर यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते ’अवधरत्न’ व साहू सूरसम्मान’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
२००३: इराक देशातील लोकांना सद्दाम हुसेन यांच्या तानशाही पासून मुक्ती मिळाली.
२००५: प्रिन्स चार्ल्सचा कॅमिला पार्कर-बोल्सशी विवाह संपन्न.
२०११: प्रख्यात भारतीय समाजसेवक अण्णा हजारे दिल्ली येथे लोकपाल बील कायदा पास करण्यासठी करीत असलेले आमरण उपोषण सरकारने आपली मागणी मान्य केल्यानंतर बंद केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१३३६: तैमूरलंग – मंगोल सरदार (मृत्यू: १८ फेब्रुवारी १४०५)
१७७०: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ थॉमस योहान सीबेक यांचा जन्म.
१८२८: गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (मृत्यू: २५ जुलै १८८०)
१८८७: विष्णू गंगाधर तथा ’दादासाहेब’ केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (मृत्यू: १९ आक्टोबर १९५०)
१८९३: राहूल सांकृतायन – इतिहासकार (मृत्यू: १४ एप्रिल १९६३)
१९२५: लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (मृत्यू: २१ आक्टोबर १९९५)
१९२९: भारतीय पद्मभूषण, पद्मश्री, संगीत-नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित शरण राणी यांचा जन्मदिन.
१९३०: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ एफ. अल्बर्ट कॉटन यांचा जन्म.
१९४८: जया भादुरी – अभिनेत्री
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा