दिनविशेष १५ मार्च
१५ मार्च :
महत्त्वाच्या घटना:
१४९३: भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.
१५६४: मुघल सम्राट अकबर याने हिंदुंवरील जिझीया कर रद्द केला.
१६८०: शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह
१८२०: मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले.
१८२७: टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.
१८३१: मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले.
१८६९: सिनसिनाटी रेड स्टॉकिंग्स प्रथम प्रो बेसबॉल संघ बनला.
१८७७: इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.
१८९२: लिव्हरपूल एफ.सी. ची स्थापना झाली.
१९०६: रोल्स रॉईस (Rolls Royce) कंपनीची स्थापना झाली.
१९१९: हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन
१९३७: अमेरिकेत पहली ब्लड बैंक सुरु
१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.
१९४६: भारताला पूर्ण स्वातंत्र्य अर्पण करण्याची घोषणा क्लेमेंट एटली द्वारे करण्यात आली.
१९५०: नियोजन आयोगाची स्थापना
१९५६: ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटर येथे ’माय फेअर लेडी’चा पहिला प्रयोग झाला.
१९५९: मुंबईमध्ये लिज्जत पापड़ या महिला गृह उद्योग ची स्थापना झाली
१९६१: ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.
१९८५: symbolics.com हे internet वरील पहिले डोमेन नेम नोंदले गेले.
१९९०: सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.
२००१: भारतीय क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी सामन्यात २८१ धावा काढल्या.
२००३: हू जिंताओ चीनच्या अध्यक्षपदी
२०११: सीरियन युद्ध सुरु झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा