सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ४ मार्च, २०२३

दिनविशेष १४ मार्च

 

दिनविशेष १४ मार्च   

दिनविशेष १४ मार्च

१४ मार्च :


महत्त्वाच्या घटना:

१९३१: ’आलम आरा’ हा पहिला भारतीय बोलपट मुंबईतील नॉव्हेल्टी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९५४: दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.

१९५५: राजकुमार महेन्द्र हे नेपाल देशाचे राजा बनले.

१९६७: अमेरीकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे पार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी येथे हलविण्यात आले.

१९७६: अमेरिकेने नेवादा या ठिकाणी परमाणु चाचणी केली.

१९८८: जपानमध्ये समुद्रांतर्गत रेल्वे वाहतुकीस प्रारंभ

१९८८: गणित प्रेमीनी प्रथम पाय डे साजरा केला होता. पाय डे संकल्पना भौतिकशास्त्रज्ञ लॅरी शॉ यांनी 1988 मध्ये केली होती. (π= 3.14) ही पायाची किंमत दिनांक १४/३ प्रमाणे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

१९८८: प्रथम सोनिया गांधी राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्ष बनल्या.

२०००: कलकत्ता येथील ’टेक्‍निशियन आय’ हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

२००१: व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्‍च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

२००१: चोकिला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रसचिव म्हणून सूत्रे हाती घेतली. त्या सिक्कीममधील आदिवासी समाजातील असून १९६४ च्या बॅचमधील आय. ए. एस. अधिकारी आहेत.

२००७: कारगिल आणि स्कार्दू यादरम्यान भारत व पाकिस्तान यांच्यात बस सेवा प्रारंभ करण्याबद्दल सहमती झाली.

२०१०: ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते ‘लोकसंस्कृती’चे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ पुण्यात देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा