सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ४ मार्च, २०२३

दिनविशेष १६ मार्च

 

दिनविशेष १६ मार्च   

दिनविशेष १६ मार्च

१६ मार्च :


महत्त्वाच्या घटना:

१५२१: फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.

१५२७: मुघल सम्राट बाबर यांनी खानवा येथील युद्धात राणा सांगा यांचा पराभव केला होता.

१५२८: फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग याचा पराभव झाला. [चैत्र शु. १४]

१६४९: शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.

१८४६: प्रथम इंग्रज- सिख युद्धाच्या माध्यमातून अमृतसर ची संधी झाली होती.

१९११: भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक उदारमतवादी राजकीय नेते व समाज सुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव मांडला.

१९१९: भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.

१९३७: महाड येथील चवदार तळ्याचे पाणी दलितांना देण्याचा अधिकार मुंबई येथील उच्च न्यायालयाने दिला.

१९४३: ’प्रभात’चा ’नई कहानी’ हा चित्रपट रिलीज झाला.

१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.

१९५५: राष्ट्रीय लसीकरण दिवस

१९३६: महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

१९६६: अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९७६: इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.

१९९२: सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक प्रदान करण्यात आले.

२०००: हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना ’के. के. बिर्ला पुरस्कार’ जाहीर

२००१: नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान

२०१२: अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये १०० शतक बनवणारे क्रिकेट विश्वातील पहिले क्रिकेट पटू म्हणजेच भारतीय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हे होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा