सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ४ मार्च, २०२३

दिनविशेष २३ मार्च

 

दिनविशेष २३ मार्च   

दिनविशेष २३ मार्च

२३ मार्च :


महत्त्वाच्या घटना:

१८३९: बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ. के. या शब्दाचा पहिला छापील उपयोग झाला.

१८५७: न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली.

१८६८: कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड येथे स्थापना झाली.

१९१९: बेनिटो मुसोलिनी यांनी मिलान इटली मध्ये हुकूमशाही राजकीय चळवळ सुरूकेली.

१९३१: सॉन्डर्सचा वध करणार्‍या भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी देण्यात आले.

१९४०: संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत

१९५६: पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.

१९६५: अमेरिकेतील अंतराळ संस्था नासाने आपले पहिले अंतरीक्ष यान ‘जैमिनी ३’ च्या साह्याने दोन व्यक्तींना अंतराळात पाठविले होते.

१९८०: प्रकाश पदुकोण याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय आहे.

१९८६: भारतीय राखीव पोलीस दलातील महिलांच्या पहिल्या तुकडीला प्रशिक्षित करण्यात आले.

१९९८: अभिनेते दिलीपकुमार यांना ’निशान-ए-इम्तियाज’ हा पाकिस्तानचा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर

१९९९: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना ‘पद्मश्री’ सन्मान प्रदान करण्यात आला.

१९९९: पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना ‘पद्मविभूषण’ सन्मानाने गौरविेण्यात आले.

१९९९: लता मंगेशकर व पंडीत भीमसेन जोशी ’पद्म भूषण’ पुरस्कार व सचिन तेंडुलकर, सुलोचना यांना ’पद्मश्री’ पुरस्कार मिळाला.

२००१: रशियाचे मिर हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळले.

२०१२: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक पूर्ण करणारे पहिले खेळाडू बनले.

२०१४: युरोपीय संघ आणि अमेरिकेने रुस राष्ट्रावर प्रतिबंध लावला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा