दिनविशेष १२ एप्रिल
१२ एप्रिल :
महत्त्वाच्या घटना:
१६०६: ग्रेट ब्रिटनने ’यूनियन जॅक’ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.
१९३५: [चैत्र शुद्ध प्रतिपदा – बलिप्रतिपदा] ’प्रभात’चा ’चंद्रसेना’ हा हिन्दी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अनेक ट्रिकसीन्स असलेला हा चित्रपट याच नावाच्या मूकपटावर बेतलेला होता.
१९६१: रशियाचा युरी गागारिन हा अंतराळात भ्रमण करणारा पहिला मानव बनला. त्याने अंतराळात १०८ मिनिटे भ्रमण करुन पृथ्वीप्रदक्षिणा केली.
१९६१: सोवियेत संघाचा युरी गागारिन अंतराळात जाणारा प्रथम माणूस झाला.
१९६७: कैलाश नाथ वांछू यांनी भारताचे १० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७८: भारतातील मुंबई ते पुणे शहरादरम्यान पहिली डबल डेक्कर रेल्वे धावली.
१९९७: पूर्व प्राथमिक प्रवेशाकरता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर
१९९७: भारतीय पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा राजीनामा.
१९९८: गेल्या शतकातील साठच्या दशकात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणारे सी. सुब्रम्हण्यम यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
२००९: झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
५९९: जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म.
१३८२: मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग [चैत्र व. ९]
४९९: महावीर, जैन धर्मसंस्थापक.
१८७१: वासुदेव आपटे, आनंद या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक व संपादक.
१८८५: महोजोदडोची शोध करणारे भारतीय पुरातत्व व संग्रहालय तज्ञ राखलदास बनर्जी यांचा जन्मदिन.
१९१०: पु.भा. भावे (पुरुषोत्तम भास्कर भावे) , मराठीतील प्रतिभासंपन्न लेखक.
१९१४: कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव – ’सासरमाहेर’, ’भाऊबीज’, ’चाळ माझ्या पायांत’ या चित्रपटांचे त्यांनी कथा, संवाद व गीतलेखन केले होते. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९५)
१९१७: विनू मांकड – सलामीचे फलंदाज व डावखुरे मंदगती गोलंदाज (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७८)
१९३२: लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते (मृत्यू: १२ ऑगस्ट २००५)
१९३७: साली भारतीय हिंदी चित्रपट क्षेत्रांतील सुप्रसिद्ध गीतकार व अभिनेते गुलशनकुमार मेहता यांचा जन्मदिन.
१९४३: सुमित्रा महाजन – लोकसभा अध्यक्ष
१९५४: सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार (मृत्यू: २ जानेवारी १९८९)
१९८१: तुलसी गॅब्बार्ड, अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात निवड झालेली पहिली हिंदू व्यक्ती.
१९८८: SEBI ची स्थापना
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा