सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, ७ मार्च, २०२३

दिनविशेष १३ एप्रिल

 

दिनविशेष १३ एप्रिल  

दिनविशेष १३ एप्रिल

१३ एप्रिल :


महत्त्वाच्या घटना:

१६४८: दिल्ली येथील लाल किल्ल्याची निर्मिती झाली.

१६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.

१७३१: इतिहासप्रसिध्द वारणेचा तह होऊन शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याचे दोन भाग झाले

१७३१: छत्रपती शाहू (सातारा) आणि छत्रपती संभाजी (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरुन असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला. [चैत्र व. २]

१७७२: वॉरन हेस्टींग्ज यांची गव्हर्नर जनरल म्हणून कलकत्ता येथे नेमणूक

१८४९: हंगेरी प्रजासत्ताक बनले.

१९१९: जालियानवाला बागची कत्तल – भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ही एक महत्त्वाची घटना होती.

१९३९: भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना.

१९४२: व्ही. शांताराम ’प्रभात फिल्म कंपनी’तून बाहेर पडले.

१९४८: भुवनेश्वर ही ओरिसा राज्याची राजधानी करण्यात आली.

१९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.

१९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.

२०००: प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री लारा दत्ता ह्या विश्वसुंदरी बनल्या.

२०१७: इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वारणा नदीवर आधारित ‘अमृत’ योजनेचा प्रारंभ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केला गेला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७४३: थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३ रे राष्ट्राध्यक्ष, २ रे उपाध्यक्ष आणि १ ले परराष्ट्रमंत्री. त्यांनी मांडलेल्या विचारांवर अमेरिकेची राज्यघटना आधारित असून तेथील लोकशाहीला ’जेफरसनची लोकशाही’ असे म्हणतात. (मृत्यू: ४ जुलै १८२६)

१८९०: भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता तसचं, भारतातील विशिष्ट लांबीचा चित्रपट ‘श्री पुंडलिक’ चे निर्माता रामचंद्र गोपाळ उर्फ “दादासाहेब” तोरणे यांचा जन्मदिन.

१८९५: वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे (मृत्यू: २९ आक्टोबर १९७८)

१८९८: प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व पटकथा लेखक चंदूलाल शाह यांचा जन्मदिन.

१९०५: ब्रूनो रॉस्सी – पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणार्‍या वैश्विक किरणांच्या विकीरणा विषयी संशोधन करणारे इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९९३ – केम्ब्रिज, मॅसेच्युसेटस, यू. एस. ए.)

१९०६: सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक (मृत्यू: २२ डिसेंबर १९८९)

१९१३: दत्ताजी ताम्हाणे, स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी विचारवंत. मृत्यू

१९२२: ज्यूलिअस न्येरेरे – टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ आक्टोबर १९९९)

१९२५: स्वातंत्र्यपूर्व भारताच्या ब्रिटीश राजवटीमधील सक्रीय स्वातंत्र्यसेनानी व प्रसिद्ध चित्रपट गीतकार वर्मा मलिक यांचा जन्मदिन.

१९४०: नजमा हेपतुल्ला – राज्यसभा सदस्य

१९५६: सतीश कौशिक – अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक

१९६३: गॅरी कास्पारॉव्ह – रशियन बुद्धीबळपटू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा