दिनविशेष ३० मार्च
३० मार्च :
महत्त्वाच्या घटना:
१६९९: शिख धर्मगुरू श्री.गुरू गोबिंद सिंघ यांनी खालसा पंथ ची स्थापना केली.
१७२९: थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.
१७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.
१८४२: अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.
१८५६: पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.
१८८१: लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.
१८८५: पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.
१९०५: मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.
१९२९: इंग्लड ते भारत अशी विमानमार्गे साप्ताहिक टपालसेवा सुरु करण्यात आली.
१९३६: मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना
१९३९: हेइंकेल १०० ह्या सैनिकी विमानाने ७४५ किमी / ताशी वेगाने उडण्याचा विक्रम केला.
१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.
१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१९४५: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१९५४: राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्न’ पुरस्कारांची स्थापना केली.
१९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या
१९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान
२०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.
२०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा