सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, ७ मार्च, २०२३

दिनविशेष २९ मार्च

 

दिनविशेष २९ मार्च   

दिनविशेष २९ मार्च

२९ मार्च :


महत्त्वाच्या घटना:

१५६१: मुघल बादशाहा अकबर यांनी मालवा प्रांताची राजधानी ‘सारंगपूर’ येथे हल्ला करून तेथील सुलतान बाजबहादूर यांचा पराभव केला.

१८४९: ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीने पंजाब खालसा केले.

१८४९: ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

१८५७: क्रांतिकारक मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या व इथूनच १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला खरी सुरुवात झाली.

१८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. या घटनेतुनच १८५७ च्या राष्ट्रीय उठावाची सुरूवात झाली.

१९३०: ’प्रभात’चा ’खूनी खंजिर’ हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१९४२: क्रिप्स योजना जाहीर

१९५४: भारत सरकारच्या कार्मिक मंत्रालया अंतर्गत कार्यरत असलेली संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच ‘भारतीय लोक प्रशासन संस्था’ ची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे प्रथम अध्यक्ष टी. एन. चतुर्वेदी होते. तसचं, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहे.

१९६२: भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या पेनिसिलिन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे अनावरण झाले.

१९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना

१९६९: भा. द. खरे यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर ‘अमृतपुत्र’ ही कादंबरी लिहिण्यास प्रारंभ केला.

१९७०: दत्तो वामन पोतदारांने ‘शिवचरीत्र’ ह्या ग्रंथाच्या लेखनास प्रारंभ केला.

१९७३: व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.

१९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.

२००४: भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तान विरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३०९ धावांची खेळी केली व त्रिशतक झळकवणारा पहिला भारतीय फलंदाज झाला.

२००४: आयर्लंड देशाने कामाच्या ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घातली. अश्या प्रकारची बंदी लागू करणारे ते जगातील पहिले राष्ट्र ठरले. २९ मार्च या तारखेपासून सार्वजनिक आरोग्य (तंबाखू) अधिनियमांतर्गत बंद असलेल्या कार्यलयाच्या परिसरात धूम्रपान करणे बेकायदेशीर ठरले आहे.

२०१४: इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा