दिनविशेष ३१ मार्च
३१ मार्च :
महत्त्वाच्या घटना:
१६६५: मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली.
१८६७: प्रार्थना समाजाची स्थापना
१८६७: डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.
१८८९: आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.
१९०१: पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकार्यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.
१९२७: डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.
१९४२: हिन्दी स्वांतत्र्य संघाची स्थापना झाली.
१९६४: मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.
१९६६: रशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह ‘ल्युना १०’ अवकाशात सोडला.
१९७०: १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.
१९९७: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान.
२००१: भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय क्रिकेट प्रकारामध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या.
२००१: सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१५०४: गुरू अंगद देव – शिखांचे दुसरे गुरू (मृत्यू: २८ मार्च १५५२)
१५१९: हेन्री (दुसरा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १० जुलै १५५९)
१५९६: रेनें देंकार्त – फ्रेन्च तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि लेखक (मृत्यू: ११ फेब्रुवारी १६५०)
१८४३: बळवंत पांडुरंग तथा ’अण्णासाहेब’ किर्लोस्कर – नाटककार (मृत्यू: २ नोव्हेंबर १८८५)
१८६५: आनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८८७)
१८७१: ’कर्नाटकसिंह’ गंगाधर बाळकृष्ण देशपांडे – स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ३० जुलै १९६०)
१९०२: भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २०००)
१९०६: जनरल के. एस. थिमय्या, भारतीय सरसेनापती.
१९३४: भारतीय कवी आणि लेखक कमला सुरय्या यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००९)
१९३८: शीला दिक्षीत – दिल्लीच्या मुख्यमंत्री
१९७२: ट्विटर चे सहसंस्थापक इव्हान विल्यम्स यांचा जन्म.
१९७८: भारतीय बुद्धिबळ खेळाडू हम्पी कोनेरू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१७२७: सर आयझेक न्यूटन, इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी.
१९१३: जे. पी. मॉर्गन – अमेरिकन सावकार (जन्म: १७ एप्रिल १८३७)
१९२६: दत्तात्रय बळवंत पारसनीस, इतिहास संशोधक.
१९४५: फ्रेडरिक बर्गियस, जर्मन रसायनशास्त्रज्ञ, नोबेल पुरस्कार विजेता.
१९७२: महजबीन बानो ऊर्फ ’मीनाकुमारी’ – अभिनेत्री (जन्म: १ ऑगस्ट १९३२)
१९७८: इन्सुलिन चे सहनिर्माते चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचे निधन.(जन्म: २७ फेब्रुवारी १८९९)
२०००: डॉ. हरदेव बहारी, हिंदी लेखक आणि शब्दकोशकार.
२००२: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी मोतुरू उदायम यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९२४)
२००४: गुरू चरणसिंग तोहरा – अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष (जन्म: २४ सप्टेंबर १९२४)
२००४: तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर – कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा