सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ४ मार्च, २०२३

दिनविशेष २५ मार्च

 

दिनविशेष २५ मार्च   

दिनविशेष २५ मार्च

२५ मार्च :


महत्त्वाच्या घटना:
१६५५: क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला.

१६६८: अमिरीके मध्ये सर्वप्रथम घोडदौड चे आयोजन करण्यात आले होते.

१७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.

१७८८: ‘कलकत्ता गॅझेट‘ या वृत्तपत्रामध्ये भारतीय बंगाली भाषेतील पहिली जाहिरात प्रकाशित करण्यात आली.

१८०७: गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.

१८०७: इंग्लंड देशांमध्ये प्रथम रेल्वे प्रवासी सेवा सुरू करण्यात आली.

१८८१: लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.

१८८५: पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.

१८९८: शिवराम परांजपे यांनी साप्ताहिक ‘काळ’ चा पहिला अंक काढला.

अत्याधुनिक सागर संशोधक ‘सागरकन्या’ या जहाजाचे जलावतरण झाले.

१८९८: स्वामी विविकानंद यांनी भगिनी निवेदिता यांना ब्रह्मचर्याची दीक्षा दिली होती.

१९०५: मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.

१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.

१९३६: मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.

१९४५: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.

१९५४: राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्‍न’ पुरस्कारांची स्थापना केली.

१९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या

१९९७: जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान

२०००: १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.

२०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.

२०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.

२०१३: मणिपूर उच्‍च न्यायालयाची स्थापना

२०१३: मेघालय या केंद्र्शाशित प्रदेशाची राजधानी शिलांग येथे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.

२०१७: राजस्थान राज्याच्या बिकानेर शहरातील महिला तनुश्री परीक यांनी भारत देशाच्या सीमा सुरक्षा बल(बीएसएफ) च्या महिला अधिकारी बनून आपल्या देशाचे व राज्याचे नाव उज्वल केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा