सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, ७ मार्च, २०२३

दिनविशेष २५ एप्रिल

 

दिनविशेष २५ एप्रिल  

दिनविशेष २५ एप्रिल

२५ एप्रिल :


महत्त्वाच्या घटना:

१६०७: ८० वर्षांचे युद्ध – नेदरलँड्सने जिब्राल्टरजवळ स्पेनचे आरमार बुडवले.

१७९२: क्लॉड जोसेफ रूगे दि लिलने फ्रेंच राष्ट्रगीत ला मार्सेलची रचना केली.

१८२९: चार्ल्स फ्रीमॅन्टल पश्चिम ऑस्ट्रेलियाला पोचला.

१८४६: मेक्सिको व टेक्सासच्या प्रजासत्ताक मध्ये सीमावाद चिघळला. चकमकी सुरू.

१८५९: प्रसिध्द सुएझ कालव्याच्या बांधकामास सुरुवात.

१८६२: अमेरिकन यादवी युद्ध – उत्तरेने न्यू ऑर्लिअन्स जिंकले.

१८६७: दक्षिण आफ्रिकेत श्वेत लोकांना मतदान करण्याची अनुमती मिळाली.

१८९८: अमेरिकेने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.

१९०१: अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यात स्वयंचलित वाहनांना नंबरप्लेट लावणे सक्तीचे केले.

१९१५: पहिले महायुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडचे सैन्य तुर्कस्तानमध्ये उतरले.

१९२५: जर्मन सैन्यदलाचे कमांडर जनरल आणि राजकारणी पॉल पॉल लुडविग हंस अँटोन फॉन बेनेकेंडोर्फ अंड वॉन हिंदेनबर्ग यांची राष्ट्रपती पदी नियुक्ती करण्यात आली होती.

१९२६: ईराणमध्ये रझा शाह पहलवी सत्तेवर.

१९४५: दुसरे महायुद्ध – मिलानमधून नाझींची हकालपट्टी.

१९५३: डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला.

१९६६: एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.

१९७४: पोर्तुगालमध्ये जनतेचा उठाव. लोकशाही पुन्हा अमलात.

१९८२: रंगीत दूरदर्शन प्रक्षेपणाला सुरुवात.

१९८३: अंतराळयान पायोनियर १०सूर्यमालेच्या पलीकडे पोचले.

१९८६: म्स्वाती तिसरा स्वाझीलँडच्या राजेपदी.

१९८९: श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.

२०००: वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.

२००५: जपानच्या आमागासाकी शहराजवळ रेल्वे अपघात. १०७ ठार.

२००८: जागतिक मलेरिया दिन

२००८: हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार, अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक आमिर खान यांना चित्रपट क्षेत्रांतील आपल्या महत्वपूर्ण योगदानाकरता मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृर्ती प्रतिष्ठान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

२०१५: ७.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात ९१०० जण मारले गेले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा