दिनविशेष २४ एप्रिल
२४ एप्रिल :
महत्त्वाच्या घटना:
१६७४: भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करुन जिंकला.
१७१७: खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.
१८००: अमेरिकेतील महाप्रचंड अशा लायब्ररी ऑफ काँग्रेसची (Library of Congress) स्थापना झाली. हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालय आहे.
१९६७: वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमिर कोमारोव्ह हा मरण पावणारा पहिला अंतराळवीर ठरला.
१९६८: मॉरिशस संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) सदस्य बनला.
१९७०: गाम्बिया प्रजासत्ताक बनले.
१९९०: डिस्कव्हरी या अंतराळयानातुन हबल ही दुर्बिण सोडण्यात आली.
१९९३: इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणार्या विमानाचे ३ अतिरेक्यांनी अपहरण केले. ब्लॅक कॅट कमांडोजनी केलेल्या कारवाईत तिन्ही अतिरेकी ठार झाले व सर्व १४१ प्रवाशांची सुखरुप मुक्तता झाली.
२०१३: ढाका, बांगलादेश मध्ये इमारत कोसळून ११२९ जणांचा बळी गेला आणि २५०० जण जखमी झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा