सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, ७ मार्च, २०२३

दिनविशेष २६ एप्रिल

 

दिनविशेष २६ एप्रिल  

दिनविशेष २६ एप्रिल

२६ एप्रिल :


महत्त्वाच्या घटना:

१४७८: इटलीतील पाझींनी फ्लोरेन्समध्ये चर्चमधील रविवारच्या सामूहिक प्रार्थने दरम्यान लॉरेन्झो दि मेदिची वर हल्ला केला. लॉरेन्झोचा भाउ ज्युलियानी मृत्युमुखी पडला.

१६०७: इंग्लंडचे काही वसाहती केप हेन्री, व्हर्जिनिया येथे पोचले. यांनी पुढे जेम्सटाउन शहर वसवले.

१६५४: यहुदी लोकांना ब्राझील देशातून बाहेर काढून देण्यात आलं.

१७५५: रशियातील जुन्या प्रख्यात मॉस्को विद्यापीठाची स्थापना.

१८०२: नेपोलियन बोनापार्टने फ्रेंच क्रांतीत देशाबाहेर पळून गेलेल्या जहागिरदारांना माफी जाहीर केली व परत फ्रांसमध्ये बोलावले.

१८४१: साली बॉम्बे गॅझेट या इंग्रजी वृत्तपत्राची स्थापना मुंबई येथे करून त्यांचे वृत्तपत्राचे प्रकाशण सर्वप्रथम एका रेशमी कापडावर करण्यात आले.

१८६५: अमेरिकन यादवी युद्ध – दक्षिणेच्या जनरल जोसेफ जॉन्स्टनने उत्तरेच्या विल्यम टेकुमेश शर्मन समोर उत्तर कॅरोलिनातील ड्युरॅम येथे शरणागती पत्करली.

१८६५: अब्राहम लिंकनची हत्या करून पळालेल्या जॉन विल्कस बूथला सैनिकांनी ठार केले.

१९०३: अटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.

१९०३: महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वकिली सुरु केली. तसचं त्यांनी त्या ठिकाणी ब्रिटीश इंडिया असोसिएशन ची स्थापना केली.

१९२५: पॉल फोन हिंडेनबर्ग वायमार प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षपदी.

१९३३: जर्मनीची गुप्त पोलिस यंत्रणा गेस्टापोची रचना.

१९३७: जर्मनीच्या लुफ्तवाफेने स्पेनच्या गर्निका शहरावर बॉम्बफेक केली. याचे परिणाम पाहून ख्यातनाम चित्रकार पाब्लो पिकासोने गर्निका हे जगप्रसिद्ध चित्र काढले.

१९४२: मांचुरियाच्या हॉन्केइको कोलियरी या कोळशाच्या खाणीत स्फोट. १,५४९ कामगार ठार. आत्तापर्यंतचा खाणीत झालेला हा सगळ्यात मोठा अपघात आहे.

१९५६: भारतातील पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते उदघाटन.

१९६२: नासाचे रेंजर ४ हे चांद्रयान चंद्रावर कोसळले.

१९६४: टांगानिका व झांझिबार देश एकत्र आले. टांझानियाची रचना.

१९७०: सुवेझ कालवा भागामध्ये पुन्हा एकदा चकमकी सुरू झाल्या. इजिप्त व इस्त्रायल यांचे हवाई हल्ले सुरू झाले. एकमेकांविरुद्धचे शत्रुत्व आणि विभागीय सत्ता संतुलन, हक्क यासाठी सशस्त्र संघर्ष सुरू.

१९७३: अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.

१९८६: युक्रेनमध्ये चर्नोबिल अणु भट्टीत अपघात. घातक किरणोत्सर्गाने युरोप, एशियातील अनेक देश प्रभावित.

१९८९: बांगलादेशमधे चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.

१९९४: चायना एरलाइन्सचे एरबस ए-३००जातीचे विमान जपानच्या नागोया विमानतळावर कोसळले. २६४ ठार.

१९९५: आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला.

२००२: जर्मनीच्या एरफर्ट शहरात रॉबर्ट स्टाइनहाउझरने आपल्या शाळेतील १३ शिक्षक, २ विद्यार्थी व १ पोलिस अधिकार्‍याला ठार मारले.

२००५: २९ वर्षांनी सिरियाची लेबेनॉनमधून माघार.

२००८: जम्मू काश्मीर राज्यात निर्मित ३९० मेगावॅट क्षमता असलेला दुल हस्ती हायडल पॉवर प्रकल्प तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देशाला समर्पित केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा