दिनविशेष १४ एप्रिल
१४ एप्रिल :
महत्त्वाच्या घटना:
१६६१: प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.
१६६५: सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.
१७३६: चिमाजीअप्पांनी मोघल बादशहाचा हस्तक जंजिरा येथील सिद्दीसाताचा पराभव करुन मराठी सत्तेचा दरारा बसविला.
१८६५: जॉन विल्कस बूथने अब्राहम लिंकनवर गोळी झाडली. लिंकन दुसर्या दिवशी मृत्यू पावला.
१९१२: आर.एम.एस. टायटॅनिकची हिमनगाशी टक्कर. बोटीला भगदाड पडून बुडु लागली.
१९४४: मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या बोटीवर महाभयानक विस्फोट. ३०० ठार. त्याकाळच्या २ कोटी पाउंडचे नुकसान.
१९४४: मुंबई गोदीत उभ्या असलेल्या ’फोर्ट स्टिकिन’ या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटि पौंडा इतके आर्थिक नुकसान झाले.
१९८६: बांगलादेशमध्ये १ किलो वजनाच्या अतिप्रचंड गारांचा वर्षाव. ९२ ठार. गारांच्या वजनाचा हा विक्रम अजुन अबाधित आहे.
१९९५: टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.
२००८: भारतातील कोलकत्ता व बांगलादेशाची राजधानी ढाका या दोन देशादरम्यान रेल्वे सेवा सुरु करण्यात आली.
२०१०: पश्चिम बंगाल, उडीसा, झारखंड आणि बिहार राज्यात आलेल्या चक्रवर्ती वादळामुळे सुमारे १२३ लोकांचे निधन झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१६२९: क्रिस्टियन हायगेन्स – डच गणितज्ञ, खगोलविद् आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध (मृत्यू: ८ जुलै १६९५)
१६७५: छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम भोसले यांच्या दुसऱ्या पत्नी राणी ताराबाई भोसले यांचा जन्मदिन.
१८३३: व्हिक्टोरिया क्रॉसचे प्राप्तकर्ता रॉस लोव्हिस मंगल्स व्हीसी यांचा जन्मदिन.
१८९१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणार्या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. (मृत्यू: ६ डिसेंबर १९५६)
१८९१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार.
१८९८: स्वातंत्र्यपूर्व भारतातील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारमधील प्रसिद्धी व प्रचार प्रमुख सुब्बीर अप्पादुराई यांचा जन्मदिन.
१९०७: भारतीय कम्युनिस्ट चळवळीचे प्रारंभिक नेते व माजी सरचिटणीस पूरणचंद जोशी यांचा जन्मदिन.
१९१४: शांता हुबळीकर – अभिनेत्री (मृत्यू: १७ जुलै १९९२)
१९१९: शमशाद बेगम – पार्श्वगायिका (मृत्यू: २३ एप्रिल २०१३)
१९२२: उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्मविभूषण (१९६९), मॅकआर्थर फेलोशिप, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, नॅशनल हेरिटेज फेलोशिप (मृत्यू: १८ जून २००९ – सॅन अन्सेल्मो, कॅलिफोर्निया, यू. एस. ए.)
१९२७: द. मा. मिरासदार – विनोदी लेखक
१९३३: सर्जनशील कला अकादमीचे संस्थापक-प्राचार्य अनिल कुमार दत्ता यांचा जन्मदिन.
१९४२: मार्गारेट अल्वा – केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल
१९४३: रामदास फुटाणे – वात्रटिकाकार
१९५७: भारतीय मल्याळम स्त्रीवादी लेखिका आणि नाटककार के. सरस्वती अम्मा यांचा जन्मदिन.
१९५७: भारतीय अवकाश वैज्ञानिक आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष तसचं, विक्रम साराभाई स्पेस सेंटर आणि लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे माजी संचालक कैलासावादिव शिवन यांचा जन्मदिन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा