दिनविशेष २८ मार्च
२८ मार्च :
महत्त्वाच्या घटना:
१७३६: बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.
१७३७: थोरले बाजीराव पेशवे यांनी दिल्लीवर चाल करुन मोगलांचा पराभव करुन दिल्लीत मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले.
मुंबईतील सहार विमानतळाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले
१८५४: क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.
१९१०: हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.
१९३०: तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली.
१९४१: नेताजी सुभाष चंद्रबोस इंग्रज शासनाच्या नजर कैदी पासून स्वत:चा बचाव करून बर्लिन येथे पोहचले.
१९४२: रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे ’इंडियन इंडिपेन्डन्स लीग’ची स्थापना केली.
१९७९: अमेरिकेतील ’थ्री माईल आयलंड’ या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.
१९८८: ६१ वि घटना दुरुस्ती करून मतदाराचे किमान वय २१ वर्षांवरून वरून १८ वर्षांवर वर आणण्यात आले
१९९२: भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे. आर. डी. टाटा यांना भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय सन्मान तत्कालीन राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
१९९८: सी-डॅक ने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.
१९९८: ’सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला ’परम-१००००’ हा महासंगणक विधिपूर्वक देशाला अर्पण करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा