सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, ७ मार्च, २०२३

दिनविशेष २७ एप्रिल

 

दिनविशेष २७ एप्रिल  

दिनविशेष २७ एप्रिल

२७ एप्रिल :


महत्त्वाच्या घटना:

११२४: डेव्हिड पहिला स्कॉटलंडच्या राजेपदी.

१२९६: डनबारची लढाई – एडवर्ड पहिल्याने स्कॉटलंडचा पराभव केला.

१५०९: पोप ज्युलियस दुसर्‍याने व्हेनिसला वाळीत टाकले.

१५२१: माक्टानची लढाई – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा फर्डिनांड मॅगेलन फिलिपाईन्समध्ये स्थानिक रहिवाश्यांशी लढताना मृत्युमुखी.

१५२६: मुघल शासक बाबर यांनी दिल्लीवरील सुलतान इब्राहिम लोदी यांचा पराभव केल्यानंत दिल्लीच्या गादीवर विराजमान झाले होते.

१६०६: मुघल शासक बादशाहा जहांगीर यांचा मुलगा खुसरो यांनी आपले वडिल जहांगीर बादशाहा यांच्या विरुद्ध बंड पुकारल्यामुळे बादशाहने त्यांना कैद केले.

१६६७: अंध व हलाखीत दिवस काढणार्‍या जॉन मिल्टनने आपले महाकाव्य पॅरेडाईझ लॉस्ट १० ब्रिटीश पाउंडला विकले.

१७७३: भारतातील युद्धांच्या खर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीला वाचवण्यासाठी ब्रिटीश संसदेने टी ऍक्ट करून कंपनीला उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.

१८१०: बीथोव्हेनने आपले प्रसिद्ध पियानो संगीत फ्युर एलिझ रचले.

१८१३: १८१२चे युद्ध – अमेरिकेने कॅनडातील ऑन्टारियो प्रांताची राजधानी यॉर्क(आताचे टोरोन्टो शहर) काबीज केली.

१८५४: पुण्याहूनमुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.

१८६१: अब्राहम लिंकनने अमेरिकेत हेबिअस कोर्पसचा मूलभूत हक्क निलंबित केला. यामुळे सरकारला कोणासही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकण्यास मोकळीक मिळाली.

१८६५: अमेरिकन गृहयुद्धातील उत्तरेचे सुटलेले युद्धबंदी घेउन जाणारे जहाज सुलतानावर मिसिसीपी नदीत स्फोट. १,७०० ठार.

१८७८: कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजूरी दिली.

१९०८: लंडनमध्ये चौथे ऑलिंपिक खेळ सुरू.

१९०९: तुर्कस्तानच्या सुलतान अब्दुल हमीद दुसर्‍याची हकालपट्टी. त्याचा भाउ मुरात पाचवा गादीवर.

१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मनीचे सैन्य ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये शिरले.

१९४५: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने फिनलंडमधून पळ काढला.

१९५०: दक्षिण आफ्रिकेत वंशभेद अधिकृत करणारा कायदा मंजूर झाला.

१९६०: टोगोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.

१९६१: सियेरा लिओनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

१९६२: जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करु लागली.

१९७४: राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे १०,००० लोकांनी निदर्शने केली.

१९८१: झेरॉक्स पार्कने माउस वापरण्यास सुरुवात केली.

१९९२: सर्बिया व मॉन्टेनिग्रोने एकत्र येउन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकची स्थापना केली.

१९९४: दक्षिण आफ्रिकेत निवडणुका. श्यामवर्णीय व्यक्तिंना मतदान करण्यास प्रथमतः मुभा.

१९९९: एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात तयार झाली.

२००५: एरबसने आपले ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक दाखवले.

२०११: अमेरिकेच्या दक्षिण भागातील सहा राज्यांत टोर्नॅडोंचा उद्रेक. ३०० पेक्षा ठार, कोट्यावधी अमेरिकन डॉलरचे नुकसान.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा