दिनविशेष २ मार्च
२ मार्च :
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७४२: विश्वासराव – पानिपतच्या ३ र्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)
१९२५: शांता जोग – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)
१९२६: केरळ चे माजी मुख्यमंत्री पी. के. वासुदेवन नायर यांचा जन्म.
१९३१: मिखाईल गोर्बाचेव्ह – सोविएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते
१९३१: राम शेवाळकर – मराठी साहित्यिक (मृत्यू: ३ मे २००९)
१९५१: असे भारतीय जे हॉलीवूड चित्रपटांना सुद्धा आवाज देतात किशोर भट्ट यांचा जन्म.
१९७३: भारतीय चित्रपट अभिनेत्री विद्या मालवडे यांचा जन्म.
१९७७: अँड्र्यू स्ट्रॉस – इंग्लिश क्रिकेटपटू
१९८६: भारतीय तिरंदाज जयंत तालुकदार यांचा जन्म.
१९९०: भारतीय चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफ यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१५६८: मीरा रत्नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई
१७००: मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन (जन्म: २४ फेब्रुवारी १६७०)
१९३०: डी. एच. लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार (जन्म: ११ सप्टेंबर १८८५)
१९३८: उत्तर प्रदेश चे पहिले राज्यपाल हार्कोर्ट बटलर यांचे निधन.
१९४९: सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, मॉन्टेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (जन्म: १३ फेब्रुवारी१८७९)
१९८६: डॉ. काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते (जन्म: १४ सप्टेंबर १९३२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा