दिनविशेष १७ नोव्हेंबर
ठळक घडामोडी
१५२५: मुघल शासक बाबर याने पाचव्यांदा भारत जिंकण्याच्या उद्देशाने भारतात प्रवेश केला.
१८३१: ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.
१८६९: भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्या सुएझ कालव्याचे उद्घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.
१९३२: तिसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. या परिषदेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इंग्लंडमधील ’लेबर पार्टी’ने बहिष्कार टाकल्यामुळे या परिषदेला केवळ ४६ प्रतिनिधी उपस्थित होते.
१९३३: अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.
१९६६: भारताच्या रिता फरिया हिने जागतिक सुंदरी हा विश्व पुरस्कार जिंकला होता, हा पुरस्कार जिंकणारी ती आशिया खंडातील महिला होती.
१९५०: ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे १४वे दलाई लामा बनले.
१९७०: सेवियत अंतराळ यान ‘ लुनाखोद -१’ चंद्राच्या भूमीवर उतरले होते.
१९९२: महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील ’भारतीय दलित साहित्य अकादमी’ची फेलोशिप जाहीर
१९९२: देवरुख येथील ’मातृमंदिर’ संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची ’जीवनगौरव’ पुरस्कारासाठी निवड
१९९६: पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या ’नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस’चे फेलो म्हणून निवड
१९९४: रशियाच्या ’मीर’ या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्या पूर्ण करून नवा विक्रम केला.
१९९९: आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवसाला युनेस्को ने मान्यता दिली होती.
२००५: राष्ट्रपती पदासाठी श्रीलंका येथे निवडणुका पार पडल्या होत्या.
२००६: अमेरिकेच्या सिनेट ने आजच्याच दिवशी भारत -अमेरिका परमाणु तहाला मंजुरी दिली होती.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
०००९: व्हेस्पासियन – रोमन सम्राट (मृत्यू: २३ जून ००७९)
१७४९: कॅनिंग चे निर्माते निकोलस एपर्टीट यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८४१)
१७५५: लुई (अठरावा) – फ्रान्सचा राजा जन्म (मृत्यू: १६ सप्टेंबर १८२४)
१९००: सरोजिनी नायडू यांच्या पुत्री पद्मजा नायडू यांचा जन्म झाला होता.
१९०१: युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष वॉल्टर हॉलस्टेन यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९८२)
१९२०: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मिथुन गणेशन यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च २००२)
१९२२: अमेरिका येथील शरीर विज्ञानशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार प्राप्त स्टेनली कोहेन यांचा जन्म झाला होता.
१९२३: केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष अरिसिदास परेरा यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २०११)
१९२५: रॉक हडसन – अमेरिकन अभिनेता (मृत्यू: २ आक्टोबर १९८५)
१९३२: शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला’ – लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत अमीट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री. वयाच्या ८२ व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली. आणि त्यांच्या रूपाने सिनेमाचा चालता बोलता इतिहासच लुप्त झाला. बेबी शकुंतला यांनी मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवला. (मृत्यू: १८ जानेवारी २०१५ – कोल्हापूर)
१९३८: रत्नाकर मतकरी (Ratnakar Matkari) – लेखक, नाटककार, निर्माते
१९४२: अमेरिकन चित्रपटसृष्टीचे प्रसिध्द निर्देशक मार्टिन स्कोर्सीस यांचा जन्म झाला होता.
१९८२: भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचा जन्म.
स्त्रोत : Google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा