सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष १८ नोव्हेंबर

 

 दिनविशेष १८ नोव्हेंबर

दिनविशेष १८ नोव्हेंबर


महत्त्वाच्या घटना:

१४९३: ख्रिस्तोफर कोलंबस यांनी पोर्तो रिको हे बेट पहिल्यांदा पाहीले.

१७३८: फ्रांस व ऑस्ट्रिया या दोन देशांदरम्यान शांती करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या होत्या.


१७७२: पेशवा माधवराव प्रथम यांचे छोटे बंधू नारायणराव ह्याने पेशवा पदाची सूत्रे सांभाळली होती.

१८०९: फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.

१८८२: अण्णासाहेब किर्लोस्करांचे ’संगीत सौभद्र’ हे नाटक रंगभूमीवर आले.


१९०५: लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.

१९१८: लाटव्हियाने आपण (रशियापासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

१९२८: वॉल्ट डिस्‍ने यांच्या ’मिकीमाऊस’ या प्रसिद्ध कार्टूनचा ’स्टीमबोट विली’ या चित्रपटाद्वारे जन्म

१९३३: ’प्रभात’चा पहिलाच रंगीत चित्रपट ’सैरंध्री’ प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने ’प्रभात’ने पुन्हा रंगीत चित्रपट काढला नाही.

१९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.

१९५६: मोरक्को या देशाने स्वतंत्रता प्राप्त केली होती.


१९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.

१९६३: पहल्या पुश-बटण टेलिफोनची सेवा चालू झाली.

१९७२: वाघाची भारताचा राष्ट्रीय पशु म्हणून निवड करण्यात आली होती.


१९९२: ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९३: दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.

२००३: आर्नोल्ड श्वार्णजेगर याची आजच्याच दिवशी कैलिफोर्निया या अमेरिकेतील प्रांताचा गवर्नर म्हणून निवड करण्यात आली होती.

२००५: प्रधानमंत्री महेंद्र राजपक्षे यांची श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली होती.

२०१३: अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहावर मावेन नामक यान पाठविले होते.

२०१५: टेनिसपटू रॉजर फेडरर ने नोव्हाक जोकोविच ला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूर लंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला

२०१५: भारतीय शटलर पी. व्ही. सिंधू ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिना मारीन हिने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

२०१५: भारतीय शटलर किदाम्बी श्रीकांत ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या तियान हुवेई ने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

२०१५: भारतीय शटलर जयराम चा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या चेन लोंग ने पहिल्याच फेरीत पराभूत केले

२०१५: भारतीय महिला दुहेरी शटलर जोडी ज्वाला व अश्विनी यांचा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव.

२०१५: भारतीय स्क़्वाॅश खेळाडू सौरव घोशाल चा बेलिबी येथे जागतिक स्क़्वाॅश स्पर्धेत ईंग्लंडच्या जेम्स विल्यस्ट्राप ने दुसऱ्या फेरीत पराभूत केले.

२०१७: आजच्याच दिवशी भारताची मानुषी छील्लर हिने जागतिक सुंदरी हा पुरस्कार प्राप्त केला होता.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८९८: प्रबोध चंद्र बागची – भारताचा अतिप्राचीन इतिहास,

१९१५: टेनिस खेळातील सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणारी ग्रैंड स्लाम जिंकणारी प्रथम दक्षिणा अमेरिका खंडातील  महिला खेळाडू अनिता लीजना हिचा जन्म झाला होता.

१९२२: रशियन कवी युरी नोरोजोव यांचा जन्म झाला होता.

१९०१: व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (मृत्यू: ३० आक्टोबर १९९०)

१९०६: मिनी कार चे निर्माते अॅलेक इझिगोनिस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८८)

१९०९: कॅपिटल रिकॉर्ड्स चे सहसंस्थापक जॉनी मर्सर यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७६)

१९१०: बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक (मृत्यू: २० जुलै १९६५)

१९३१: श्रीकांत वर्मा – हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य (मृत्यू: ? ? १९८६)

१९४५: महिंदा राजपक्षे – श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा