सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०२२

ई- काराची वाक्ये

ई- काराची वाक्ये 

ई- काराची वाक्ये 

 

मधाची बाटली . 

वाकडी काकडी . 

दाट सावली .

वासाची उटणी . 

कमी काम. 

भाजी चिरा .

 कमी काम. 

पणती लावा . 

इडली -चटणी . 

बासरी वाजवली . 

मराठी भाषा . 

गरम चपाती . 

तिखट चटणी . 

काळी टिकली . 

पीक पाणी . 

निराळी चव. 

गरिबी वाईट.

 बिचारा भिकारी . 

रिकामी पिशवी . 

हिरवी साडी . 

चवदार काकडी . 

दीपकची गाडी . 

पाटलाची फजिती .

रिकामी बाटली . 

कडवट कारली . 

माझी मावशी .

खिडकी लावली .

 चिमणी बसली . 

किटली पडली .

 टिकली लावली .  

गादी उचलली . 

खिर वाढली . 

ढीग भरला . 

नदी आटली . 

पाटी आणली . 

वाटी हरवली . 

साडी फाटली . 

लाठी मारली .

माळी आला . 

यादी बनवली . 

भरणी पडली . 

वीट मारली . 

शीळ घातली . 

चीर पडली . 

तीर मारला . 

समई लावली . 

पपई कापली . 

धरणी माता . 

वीजवाहक तार. 

चटणी भाकरी . 

भाजी भाकरी .

मामी गाडीत बसली . 

हिराबाई घरी आली . 

राणी गाडीवर बसली . 

नीता नदीला चालली . 

गीता लिहीत बसली . 

रीना पावसात भिजली . 

ताई पहिली आली . 

शहाणी माझी बाळी . 

मी परी पाहिली . 

मिरची तिखट लागली . 

डाळीची आमटी वाढली . 

झाडाची सावली पडली . 

मावशी चिखलीला निघाली .

बाजरी काढली नाही . 

झाडी बरीच वाढली . 

मी बासरी वाजवली .

 मी भाजी मागितली . 

काशीरामला राखी दिली . 

ताई राखी आण. 

गणपतीची आरती झाली . 

बाजरीची मळणी झाली . 

बळीराम सावलीत बसला . 

पाटील पारावर बसला . 

नागीण बिळात चालली . 

पणती विझली नाही . 

दीपिकाची बातमी समझली .

नवीन गाळणी आणली . 

काकीची साडी भिजली .

 निळी रिबीन आणली . 

धीरज गावी निघाला . 

सारी तयारी झाली . 

आई तयारीला लागली . 

सगळी कामाला लागली . 

फराळाची मजा आली . 

दाराची कडी लावली . 

खाली उडी मारली . 

मनी आजारी पडली . 

कालिदास पाणी भर. 

मनीषा भाजी कर.

चिमणी उडाली आकाशी .

 एक टाळी वाजवली . 

चिमणी चिवचिवत आली . 

निळी पिशवी उचलली . 

कपाळी टिकली लावली . 

काळी पाटी काढली .

 हिरवी भाजी चिरली . 

ताई लवकर उठली . 

आजी भाजी कर. 

भाजी शिजली नाही . 

आजी काशीला निघाली . 

मी चपाती मागितली . 

दिवाळीत आकाशदिवा लावला .

बादलीत पाणी भरा . 

सरिता खीर वाढ. 

बाळाला मिठी मारली . 

नदीत पाणीच पाणी .

 साखळी नळीला लावली . 

सकाळी सगळी जमली . 

रिकामी रिक्षा निघाली . 

मी उडी मारली . 

मनीषा गरगर फिरली . 

भाजीवाली आली नाही . 

आमची आवडती गाणी . 

दिलीपची गाडी निघाली .

 निळी पगडी आणली .

किती आळशी काशिनाथ. 

चिवचिव चिमणी . 

सविता खडीसाखर खा . 

पायरीवर निमा बसली . 

खिडकीत वही सापडली . 

शशिकला कणिक मळ. 

अजित कळशी उचल. 

रिमझिम पावसात भिजा . 

सगळी मला चिडवतील. 

नवीन किसणी आणली . 

कविता कारली खीस. 

अविनाश कविता वाच. 

पक्षी किलबिल करतात .

मी कहाणी वाचली .

 जिजाबाई शिवाजीची आई. 

पायावरती गिरकी मारली .

 मी तिकीट काढली .

 विहीर रिकामीच राहिली .

 आज किती तारीख. 

बडबड कमी करावी . 

धरणी आईची माया . 

नवी पाटी आणली . 

लीना वीणा वाजव. 

दारावर चिमणी बसली . 

दादाची पाटी हरवली . 

माझी मावशी आली .

लता दीदी गाणी गात. 

मी हिरवा पक्षी पहिला . 

मावशी पिवळी साडी आण. 

फिरता फिरता ती पडली . 

इडली चटणी हवी . 

बिचारा भिकारी परत फिरला .

 हलगीचा आवाज कानी आला . 

कमी काम कमी दाम. 

सहलीला फारच मजा आली . 

पाटलाची फारच फजिती झाली .

 चहाची नवीन किटली आणली .

 मावशी ताजी भाजी आण. 

मी रामाला काठी मारली

स्त्रोत : Google 

इ काराची वाक्ये

उ काराची वाक्ये

सर्व प्रकारची वाक्ये


ज्ञानात भर 👇👇

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा