दिनविशेष ९ नोव्हेंबर
ठळक घडामोडी
१५८०: स्पेन या देशाच्या सेनेने आयर्लंड देशावर आक्रमण केले होते.
१७९४: तत्कालीन रशियाच्या सेनेने पोलंडची राजधानी वारसा ताब्यात घेतली होती.
१९०६: आपल्या कार्यकालात देशाबाहेर जाणारे थिओडोर रुझव्हेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली.
१९२३: दिनचर्या नावाचे एक पत्र दतात्रय गणेशजी यांनी पुण्यात सुरु केले.
१९३७: जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला.
१९४७: भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.
१९४९: कोस्टारिका या देशाने संविधानाचा अंगीकार केला होता.
१९५३: कंबोडियाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९५४: दार्जीलिंग या थंड हवेच्या ठिकाणी हिमालय पर्वतारोहण संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
१९६०: रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले. ’फोर्ड’ आडनाव नसणारे ते पहिलेच अध्यक्ष होते. मात्र जॉन केनेडी यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यामुळे एक महिन्यातच त्यांनी राजीनामा दिला.
१९६५: इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बर्याच भागाचा वीजपुरवठा १२ तास खंडित झाला.
१९६७: रोलिंग स्टोन मासिकांचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९८८: मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.
१९८९: ब्रिटनने मृत्यू दंडाच्या शिक्षेवर पूर्णपणे बंदी घातली होती.
१९९७: साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चा जनस्थान पुरस्कार प्रदान
२०००: उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना
२०००: न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासोचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.
२०००: उत्तराखंड राज्याची निर्मिती.
२००१: पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आजच्याच दिवशी संयुक्त राष्ट्र या जागतिक संस्थेच्या महासभेला संबोधित केले होते.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१४८३: मार्टिन ल्युथर यांचा जन्म झाला होता.
१८०१: आटवलेल्या दुधाचे शोधक गेल बोर्डन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १८७४)
१८६७: जैन तत्त्वज्ञानी, विद्वान, कवी श्रीमद राजचंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १९०१)
१८७७: सारे जहाँन से अच्छा चे पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते कवी मोहम्मद इक़्बाल यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९३८)
१८७७: सर मुहम्मद इक्बाल – पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते (मृत्यू: २१ एप्रिल १९३८)
१८८९: प्रसिध्द भारतीय पत्रकार इंद्र विद्यावाचस्पती यांचा जन्म झाला होता.
१९०४: पंचानन माहेश्वरी – सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ (मृत्यू: १८ मे १९६६)
१९१८: तायक्वोंडो मार्शल आर्ट चे निर्माते चोई हाँग हाय यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून २००२)
१९२४: पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक, गुरु व बंदिशकार (मृत्यू: १० जानेवारी २००२)
१९३१: एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत (मृत्यू: ६ आक्टोबर २००७)
स्त्रोत : Google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा