सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष २२ नोव्हेंबर

 

 दिनविशेष २२ नोव्हेंबर

दिनविशेष २२ नोव्हेंबर


महत्त्वाच्या घटना:

१८५७: कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना.

१८५८: कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना

१९४३: लेबनॉन (फ्रान्सपासुन) स्वतंत्र झाला.

१९४८: मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा

१९५०: आजच्या दिवशी अमेरिकेतील रिचमंड हिल्स येथे भीषण रेल्वे दुर्घटनेत ७९ लोक मृत्यमुखी पडले होते.

१९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन

१९६५: संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.

१९६८: आजच्याच दिवशी मद्रास राज्याचे नामकरण तामिळनाडू करण्याचा प्रस्ताव लोकसभेत पारित करण्यात आला होता.

१९६८: द बीटल्स यांनी द बीटल्स (द व्हाईट अल्बम) प्रकाशित केला.

१९७५: जुआन कार्लोस आजच्याच दिवशी स्पेन ह्या देशाचे राजा म्हणून नियुक्त झाले होते.

१९८६: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत ३४वे शतक केले.

१९८९: आजच्याच दिवशी मंगळ, शुक्र, शनि, युरेनस, नेपच्यून व चंद्र हे सर्व एका सम रेषेत आले होते.

१९९१: डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू

१९९७: नायजेरियात ’मिस वर्ल्ड’ स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार

२००५: अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.

२००६: भारतासह विश्वातील अन्य सहा देशांनी सूर्यासारखी उर्जा निर्मिती करणाऱ्या पहिल्या फ्युजन रिएक्टरची स्थापना करण्यासाठी पेरीस येथील बैठकीत ऐतेहासिक करार केला होता.

२०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८०८: थॉमस कूक – पर्यटन व्यवस्थापक (मृत्यू: १८ जुलै १८९२)

१८६४: भारताची प्रथम महिला चिकित्सक रुक्माबाई यांचा जन्म झाला होता.

१८७७: एफ.सी. बार्सिलोनाचे संस्थापक जोन गॅम्पर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९३०)

१८८०: केशव लक्ष्मण दफ्तरी – ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, वैदिक वाङ्‍मय, वेदान्त तत्त्वज्ञान आणि होमिओपाथी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९५६)

१८८२: प्रसिध्द भारतीय उद्योजक वालचंद हिराचंद जन्म झाला होता.

१८८५: हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार (मृत्यू: १८ आक्टोबर १९५१)

१८९०: चार्ल्स द गॉल – फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७०)

१८९९: भारतीय स्वतंत्रता सेनानी शहीद लक्ष्मण नायक यांचा जन्म झाला होता.

१९०९: द. शं. तथा ’दादासाहेब’ पोतनीस – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार (मृत्यू: २७ ऑगस्ट १९९८)

१९१३: डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (मृत्यू: १६ जानेवारी १९८८ – पुणे)

१९१५: किशोर साहू – चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८०)

१९१६: भारतीय स्वतंत्रता सेनानी शांती घोष यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.

१९२२: साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा जन्म.

१९२६: मेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक आर्थर जोन्स यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००७)

१९३९: मुलायमसिंग यादव – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री


१९४३: बिली जीन किंग – अमेरिकन लॉनटेनिस पटू

१९६७: बोरिस बेकर – ६ वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेला जर्मन लॉनटेनिस पटू

१९६८: पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते रासमुस लेर्दोर्फ यांचा जन्म.

१९७०: मार्वन अट्टापट्टू – श्रीलंकेचा क्रिकेट कर्णधार

१९८०: नेपस्टरचे संस्थापक शॉन फॅनिंग यांचा जन्म.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा