दिनविशेष २१ नोव्हेंबर
महत्त्वाच्या घटना:
१८७७: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.
१९०६: चीन ने आजच्याच दिवशी १९०६ साली अफिम च्या व्यापारावर बंदी घातली होती.
१९११: संसदेच्या निवडणुकीत उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.
१९४२: राजा नेने दिग्दर्शित ’दहा वाजता’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
१९५५: संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.
१९५६: एकमताने आजच्याच दिवशी प्रस्ताव पारित करून शिक्षक दिनाला मान्यता देण्यात आली होती.
१९६२: भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.
१९६२: भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.
१९६३: केरळ येथील थुंबा या प्रक्षेपण केंद्रावरून आजच्याच दिवशी अग्निबाण सोडून भारतीय अंतराळ कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती.
१९७१: बांगलादेश मुक्ती संग्राम – भारतीय सैन्य व बांगलादेश मुक्ती वाहिनी यांनी गरीबपूरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव केला.
१९७२: दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.
१९८६: मध्य आफ्रिकी गणराज्याने आजच्याच दिवशी संविधानाचा स्वीकार केला होता.
२००२: आजच्याच दिवशी जफर उल्ला खान जमाली हे पाकिस्तान चे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले होते.
२००५: आजच्याच दिवशी श्रीलंका या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून रत्नसिरी विक्रमनायके यांना नियुक्त करण्यात आले होते.
२००७: तत्कालीन पेप्सिको कार्यकारी अधिकारी इंदिरा नुई यांना अमेरिका भारत व्यापार परिषद मध्ये समाविष्ट करण्यात आले होते.
२००८: आजच्याच दिवशी भारताचे पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी जागतिक महामंदीच्या परिस्थितीत भारत ८ टक्के इतका विकास दर गाठेल असा विश्वास व्यक्त केला होता.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१६९४: व्होल्टेअर – फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक (मृत्यू: ३० मे १७७८)
१८७२: प्रसिध्द राजस्थानी कवी व स्वंतत्रता सेनानी यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
१८९९: ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्णा महाबत यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९८७)
१९१०: चीनी भाषेतील लेखक छ्यान चोंग्शू यांचा जन्म.
१९१६: परमवीर चक्र प्राप्त भारतीय सैनिक यदुनाथ सिंह यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता.
१९२६: प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९२)
१९२७: शं. ना. नवरे – लेखक (मृत्यू: २५ सप्टेंबर २०१३)
१९३३: हिंदी भाषेचे प्रमुख कथाकार ज्ञान रंजन यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता.
१९४१: गुजरात राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता.
१९८७: ईशा करवडे – भारतीय बुद्धीबळपटू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा