दिनविशेष २ एप्रिल
२ एप्रिल :
महत्त्वाच्या घटना:
१६७९: औरंगजेबाने हिंदूवर ‘जिझिया’ कर लावला.
१८७०: गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.
१८८५: मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मूळ ’पुणे सार्वजनिक सभा’ आणि ’बाँम्बे असोसिएशन’ या संस्थांमध्ये आहे असे मानले जाते.
१८९४: छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
१९७५: कॅनडामध्ये जगात सर्वात जास्त उंचीचा म्हणजे ५५५.३५ टॉवर बांधून पुर्ण झाला.
१९८२: फॉकलंडचे युद्ध – अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.
१९८४: सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता.
१९८९: ताणलेले संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे क्यूबातील हॅवाना येथे आगमन
१९९०: स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना
१९९८: कोकण रेल्वेवरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस या गाडीचा प्रारंभ झाला.
२०११: अठ्ठावीस वर्षांच्या कालखंडानंतर भारतचा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजयी.
२०११: क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा २८ वर्षांच्या कालखंडानंतर विजय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा