सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, ७ मार्च, २०२३

दिनविशेष १ एप्रिल

 

दिनविशेष १ एप्रिल  

दिनविशेष १ एप्रिल

१ एप्रिल :


महत्त्वाच्या घटना:

१६६९: उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.

१७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.

१८८१: लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.

१८८२: पोस्टखात्याची बचत सेवा योजना सुरु झाली.

१८८५: पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.

१८८७: मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.

१८९५: भारतीय लष्कर स्थापन झाले.

१९०५: मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.

१९२४: रॉयल कॅनेडियन हवाई दल स्थापन झाले.

१९२८: पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला.

१९३३: भारतीय विमानदलाची स्थापना.

१९३५: भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.

१९३६: मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना

१९३७: रॉयल न्यूझीलंड हवाई दल स्थापन झाले.

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.

१९४५: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.

१९५४: राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्‍न’ पुरस्कारांची स्थापना केली.

१९५५: गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.

१९५७: भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.

१९६९: भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरु झाले.

१९७३: कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरूवात झाली.

१९७६: ऍपल इंक. कंपनी ची स्थापना झाली.

१९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या

१९९०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्‍न प्रदान.

१९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान

२०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.

२०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.

२००४: गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा