सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, ७ मार्च, २०२३

दिनविशेष ४ एप्रिल

 

दिनविशेष ४ एप्रिल  

दिनविशेष ४ एप्रिल

४ एप्रिल :


महत्त्वाच्या घटना:

१८८२: ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या .

१९४४: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.

१९४९: पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी संरक्षणविषयक सामंजस्य करार करुन ’नाटो’ची (NATO) स्थापना केली.

१९४९: पश्चिम युरोपातील राष्ट्रे व अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक उत्तर अटलांटिक करार म्हणजे ‘नाटो करार’ करण्यात आला.

१९६८: ’नासा’ने ’अपोलो-६’ चे प्रक्षेपण केले.

१९६८: मेम्फिस, टेनेसी येथे जेम्स अर्ल रे याने मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांची हत्या केली.

१९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८२३: सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता, अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारी ’सिमेन्स’ ही बलाढ्य कंपनी त्याच्याच भावाने स्थापन केली आहे. (मृत्यू: १९ नोव्हेंबर १८८३)

१८४२: एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (मृत्यू: ३ आक्टोबर १८९१)

१८९३: पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १९८५)

१९०२: पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (मृत्यू: १ एप्रिल १९८४)

१९०६: फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे स्थापक एवेरी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९९४)

१९३३: रामचंद्र गंगाराम तथा ’बापू’ नाडकर्णी – डावखुरे मंदगती गोलंदाज

१९७३: भारतीय संचालक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६१७: जॉन नेपिअर – स्कॉटिश गणितज्ञ, लॉगॅरिथम सारणीचे जनक (जन्म: ? ? १५५०)

१९२३: जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ (जन्म: ४ ऑगस्ट १८३४)

१९३१: आंद्रे मिचेलिन – फ्रेन्च उद्योगपती (जन्म: १६ जानेवारी १८५३)

१९६८: मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते यांची हत्या (जन्म: १५ जानेवारी १९२९)

१९७९: पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भूट्टो यांना फाशी (जन्म: ५ जानेवारी १९२८)

१९८७: सच्‍चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (जन्म: ७ मार्च १९११- खुशीनगर, देवरिया, उत्तर प्रदेश)

१९९६: आनंद साधले – संस्कृत वाङ्‌मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (जन्म: ५ जुलै १९२०)

२०००: वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर – कलादिग्दर्शक (जन्म: ? ? ????)

२०१६: भारतीय वकील आणि राजकारणी पी. ए. संगमा यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९४७)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा