दिनविशेष ५ एप्रिल
५ एप्रिल :
महत्त्वाच्या घटना:
१६६३: पुण्याच्या लाल महालावर अचानकपणे केलेल्या हल्ल्यात शिवाजीमहाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली.
१६७९: राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले. [चैत्र व. १०]
१९३०: २४१ मैल प्रवास करुन महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा संपविली.
१९४९: भारत स्काऊट गाईडची स्थापना
१९५५: प्रकृती अस्वास्थ्यामुळे विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.
१९५७: कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.
२०००: अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. – १० या मराठी उपग्रह वाहिनीचे ’सह्याद्री’ असे नामकरण करण्यात आले.
२०००: जळगाव नगरपालिकेच्या १७ माजली इमारतीचे उद्घाटन.
१९९९: राष्ट्रीय समुद्री दिवस भारताच्या मालकीचं पहिलं जहाज एस.एस. लॉयल्टी लंडनला रवाना झालं.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८२७: सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (मृत्यू: १० फेब्रुवारी १९१२)
१८५६: बुकर टी. वॉशिंग्टन – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९१५)
१९०८: बाबू जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान (मृत्यू: ६ जुलै १९८६)
१९०९: अल्बर्ट आर. ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (मृत्यू: २७ जून १९९६)
१९१६: ग्रेगरी पेक – हॉलीवूड अभिनेता (मृत्यू: १२ जून २००३)
१९२०: डॉ. रफिक झकारिया – महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य (मृत्यू: ९ जुलै २००५)
१९२०: आर्थर हॅले – इंग्लिश कादंबरीकार (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००४)
१९६६: भारतीय-अमेरिकन अभिनेते आणि निर्माते आसिफ मांडवी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९१७: शंकरराव निकम – स्वातंत्र्यशाहीर
१९२२: पंडिता रमाबाई – विधवा, परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका, संस्कृत पंडित (जन्म: २३ एप्रिल १८५८)
१९४०: चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (जन्म: १२ फेब्रुवारी १८७१)
१९६४: गोपाळ विनायक भोंडे – नकलाकार
१९९३: दिव्या भारती – हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री (जन्म: २५ फेब्रुवारी १९७४)
१९९६: भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन – बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक
१९९८: रुही बेर्डे – चित्रपट व नाट्य अभिनेत्री
२००२: मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया – दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा