दिनविशेष ७ मार्च
७ मार्च :
जन्म :
१५०८: हुमायून – दुसरा मुघल सम्राट (मृत्यू: १७ जानेवारी १५५६)
१७६५: फोटोग्राफी चे शोधक निसेफोरे नाऐप्से यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै १८३३)
१७९२: सर जॉन विल्यम हर्षेल – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक (मृत्यू: ११ मे १८७१)
१८४९: ल्यूथर बरबँक – महान वनस्पतीतज्ञ (मृत्यू: ११ एप्रिल १९२६)
१९११: सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (मृत्यू: ४ एप्रिल १९८७ – नवी दिल्ली)
१९१८: मराठी साहित्यिक स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर यांचा जन्म.
१९३४: नरी कॉन्ट्रॅक्टर – भारताचा यष्टिरक्षक
१९४२: उमेश कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९५२: सर विवियन रिचर्ड्स – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू
१९५५: अनुपम खेर – चित्रपट अभिनेता
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९२२: गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते, शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या (जन्म: १५ ऑगस्ट १८६७)
१९५२: परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ.
१९५७: मागासवर्गीयांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कुमाँऊ परिषदेची स्थापना केली. (जन्म: १० सप्टेंबर १८८७)
१९६१: गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे चौथे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे पहाडी पुरूष, प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष, भारतरत्न
१९७४: माजी अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी यांचे निधन.
१९९३: इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (जन्म: २६ आक्टोबर १९००)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा