पर्वत आणि उंदीर
एकदा एक पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद सुरू होता. 'श्रेष्ठ कोण?' यावर ते भांडत होते.
पर्वत म्हणाला, "तू किती छोटा प्राणी आहेस, तू माझ्याहून अजिबात श्रेष्ठ नाहीस."
उंदीर पटकन म्हणाला, "मला माहित आहे की, मी तुझ्या एवढा मोठा नाही. पण तू तरी कुठे माझ्या एवढा लहान आहेस!"
पर्वत म्हणाला, "मोठ्या आकाराचे अनेक फायदे असतात. मी मोठा असल्याने आकाशात वाहणाऱ्या ढगांना अडकवू शकतो."
उंदीर म्हणाला, "तू त्या ढगांना अडवू शकतोस. पण तुझ्या पायथ्याशी मी मोठी बिळे करतो. तेव्हा तू मला अडवू शकतोस का?"
छोट्या उंदराने आपल्या चतुराईने पर्वतावर मात केली व तो आपल्या बिळात घुसला.
तात्पर्य: छोटा असो की मोठा, प्रत्येकाला स्वतःचे महत्त्व असतेच.
Source - Google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा