सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२

व्यंगाचा फायदा

 व्यंगाचा फायदा  


कथा काल्पनिक आहे पण फार मोठा अर्थ सांगते.


एक छानसे पठार होते. मस्त हिरवेगार गवत असल्या कारणाने बऱ्याच मेंढ्या त्या पठाराच्या अवतीभवती फिरायच्या. पठाराच्या मध्यभागी एक टेकडी होती. खूप सरळ चढण असलेली. त्याच्यावर जाणे अवघड असल्याकारणाने मेंढ्या त्या दिशेने कधी प्रयत्नच करत नसत. एकदा त्या मेंढ्यांच्या कळपातील एका वयस्क मेंढीने सर्वांना जवळ बोलावले. अर्थात सर्वांनी कळपाच्या नियमाप्रमाणे त्या मेंढीच्या बाजूने मोठा घोळका केला. त्या वयस्क मेंढीने सर्व मेंढ्यांना सांगितले “आज आपण एक शर्यत लावायची आहे. जी मेंढी त्या टेकडीवर सर्वात आधी चढेल तिला या कळपाचे प्रमुख म्हणून घोषित केले जाईल.”


वयस्क मेंढीने असे म्हणताच सर्वांनी टेकडीकडे मोर्चा वळवला. सर्व मेंढ्या एकमेकांना धक्के देत टेकडीच्या दिशेने धावल्या. काही मेंढ्या “ही टेकडी चढणे अशक्य आहे” असे म्हणून टेकडीच्या पायथ्याशी बडबडकरीत बसल्या.


बर्याच मेंढ्या थोड्यावर जाऊन घसरून खाली पडायच्या. त्यातल्याही बर्याच थकल्या आणि खाली येऊन “हि टेकडी चढणे निव्वळ अशक्य आहे.” असे म्हणून लागल्या. खालच्या गलक्यातून जेव्हा “हि टेकडी चढणे अशक्य आहे” असा एकच सूर येऊ लागला तेव्हा ते ऐकून उरलेल्या मेंढ्यांचे अवसान गळले आणि थोड्या वेळाने जवळ जवळ सगळ्याच मेंढ्या खाली आल्या आणि “हि टेकडी चढणे अशक्य आहे” असे म्हणून लागल्या. त्यासार्वांमध्ये एकाच मेंढी सतत चढत होती, पडत होती, पुन्हा चढत होती थोड वर जात होती. पुन्हा पडली कि त्याच जोमाने वर जात होती. तिचे खाली असलेल्या मेंढ्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते.


थोड्यावेळाने ती टेकडीवर पोचली आणि खाली आली. सर्वांनी तिचे फार कौतुक केले. वयस्क मेंढीने तिला जवळ बोलावले तिचे अभिनंदन केले आणि विचारले “हे तूला कसे शक्य झाले? इतर सर्व मेंढ्या खाली बसून हे शक्य नाही असे करत बसल्या, पण तू मात्र त्यांच्याकडे लक्ष न देता टेकडीवर पोचलीस.”  असे म्हणून झाले तरी त्या मेंढीने काहीच उत्तर दिले नाही.


अजून एकदा प्रश्न केल्यावर त्या कळपातल्या एका मेंढीने “हि मेंढी मुकी बहिरी  आहे, हिला बोलयला आणि ऐकायला येत नाही” असे जोरात सांगितले. 


बऱ्याचदा आपण समाजातील काही व्यक्तींच्या व्यंगामुळे त्यांच्यावर नकळत गरजेपेक्षा जास्ती किव करतो. मुळात, त्यांच्याबद्दल काळजी वाटणे स्वाभाविक आहे, पण काळजी करता करता त्यांच्यावर किव व्यक्त करून आपण स्वताचे नुकसान करून घेतो, आणि त्यांच्याकडूनही शिकण्यासारखे बरेच आहे हे विसरून जातो. आपण समाजात वावरताना प्रत्येक घटकापासून शिकू शकतो. आपण काय करायचं? कोणाच ऐकायचं? कोणाकडे दुर्लक्ष करायचे? याचा विचार करून आपले ठरलेले कार्य करायला हवे.


English Moral Stories

Marathi Stories

Kishor Masik Goshti

Source - Google

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा