अहंकार
एकदा एका राज्यात एक मूर्तिकार राहत असे. तो खूप छान, सुबक अशा मूर्ती बनवत असे. एकदा त्या गावच्या सावकाराने त्याला घरी बोलवून त्याची हुबेहूब मूर्ती बनविण्याचे काम त्याला दिले. मूर्तिकार एवढा नावाजलेला नव्हता, पण सावकाराला कुठून तरी समजल म्हणून त्याने त्याला हे काम दिले. काही दिवसांनी मूर्तिकार सावकारासारखी दिसणारी अशी हुबेहूब मूर्ती घेऊन आला. ती मूर्ती बघून सावकार स्वतः इतका अचंबित झाला, त्याला त्याच्या डोळ्यांवर विशावासच बसेन. पाटलाने त्याला खूप पैसे दिले. सावकाराची राजाच्या प्रधानाशी ओळख होति. त्याने तो मूर्ती प्रधानाला दखवली. प्रधानजी तर मूर्तीशीच समजून गप्पा मारू लागले. प्रधान मार्फत मूर्तिकार राजापर्यंत पोचला. स्वतःची मूर्ती बनवून घेतली आणि खूप पैसे दिले. राजाचा एकदम खास मर्जीतला माणूस झाला आणि पाहता पाहता श्रीमंतही झाल. साधारण श्रीमंती आली की जे होत, तेच झल. मूर्तिकार गर्विष्ठ झाल, अहंकारी झाला. इतरांना तुच्छ समजू लागला.
एकदा त्यांच्या राज्यात एक महान ज्योतिषी आला असल्याचे त्याला समजले. आपले जीवन एकदम सुखात चालू आहे, पण भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचा मोह त्याला झाला. त्याने त्या ज्योतिषाला घरी बोलविले. आणि भविष्य विचारले. ज्योतिषाने मुर्तीकाराचाहात बघून "बरोबर २१ दिवसांनी तुझा मृत्यू होणार असल्याचे भाकीत वर्तवले. तसा मूर्तिकार जोरजोरात हसायला लागला. त्या ने त्या ज्योतिषाच्या तोंडावर त्याचा आणि ज्योतिष शास्त्र लोकांना मूर्ख बनविण्यासाठी असते, वगैरे बोलून त्या ज्योतिषाला घराबाहेर हाकलून दिले.
पण, मूर्तिकार थोडा घाबरला. काही तरी उपाय करायला हवा असा विचार करायला लागला. त्याने मनाशी काही तरी ठरवले आणि कामाला लागला. अहोरात्र कष्ट करून त्याने त्याच्या सारख्या दिसणाऱ्या अशा ९ हुबेहूब मुर्त्या तयार केल्या. त्याने विचार केला जर यमराज आपल्याला न्यायला आलेच तर या सर्वांमधून आपल्याला ओळखूच शकणार नाहीत आणि फसतील. आपण एवढे निष्णात आहोत की अचूक मुर्त्या बनवून यमाला फसवू आणि त्याला तसेच परत जावे लागेल. आदल्या दिवशी शेवटच्या एकदा सगळ्या मुर्त्या बघून १००% खात्री करून घेतली.
बरोबर २१ व्या दिवशी मूर्तिकार त्या ९ मुर्तांबरोबर अडवा झाला. काही वेळाने खरोखर यमराज आले. यमराज सुद्धा खरोखर बुचकळ्यात पडले. आता यातला खरा मूर्तिकार कोण? चुकून दुसऱ्या कोणाला नेल तर आपल्याला पाप लागेल. यमराज पुढे मोठा प्रश्न पडला. त्याने खूप विचार केला. त्याला लक्षात आले मूर्तीकारांने त्याच्या सारख्या दिसणाऱ्या मुर्त्या बनवून आपल्या पुढे पेच निर्माण केला आहे. काही तरी युक्ती करून यातल्या खऱ्या मूर्तीकाराला स्वताहून जागे करता आले तर बरे होईल. त्याने थोडावेळ मनाशी विचार केला. त्याने मूर्तिकाराच्या अहंकाराचा फायदा करून घ्यायचे ठरवले.
आपल्या रेड्याशी बोलायच्या निमित्ताने त्याने मूर्तीकाराला उद्देशून म्हणले "अरे हा मूर्तिकार खूपच हुशार आणि मोठा कलाकार आहे. त्याने स्वताच्या काय हुबेहूब मुर्त्या बनविल्या आहेत. वा, खूपच छान. पण त्या तिकडच्या मूर्ती मध्ये थोडी चूक झाली आहे. ती मात्र त्याने करायला नको होती. "
यमाने असे म्हणताच त्या मूर्तीकाराने ताडकन उठून उत्तर दिले शक्यच नाहि. मी आणि चूक अशक्य.
यमराज मनोमन हसले आणि खऱ्या मूर्तीकाराला म्हणाले, मला माहित होत, तूझा अहंकार तुला स्वस्थ बसू देणार नाही. म्हणून मी मुद्दाम असे म्हणले. माझी युक्ती कामाला आली. आता चल माझ्या बरोबर. आणि यमराज त्याला घेऊन गेले.
अहंकार हा माणसाचा अंत जवळ आणतो. मग तो कोणत्याही गोष्टीचा असो.
Source - Google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा