सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२

धर्म म्हणजे काय ?

 धर्म म्हणजे काय ?


एक राजा होता. प्रजेचा एकदम लाडका. अत्यंत शूर पण तितकाच कनवाळू. हुशार आणि कर्तबगार. असा राजा लाभणे म्हणजे भाग्यच, असे बाजूच्या राज्यातले लोक म्हणत. त्या राज्यातले लोक त्याचा खूप आदर करत. न्याय देताना कुठला भेदभाव नाही की कोणासाठी दुजाभाव नाही. फक्त काही वेळा धर्माच्या नियमांच्या नावाखाली तंटे वाढले गेले कि हतबल होत असे. पण क्वचित प्रसंगी स्वतःच्या सदसदविवेकबुद्धीचा वापर करून धर्माच्या नावावर थोतांड माजविणार्यांवीरोधात जाऊन न्याय करत असे. नक्की धर्म म्हणजे काय हे माहित नसल्याने, आपण करतो ते योग्यच आहे असा विश्वास त्याला नसे. त्यामुळे “धर्म म्हणजे काय कोणी सांगेल का?” असे तो त्याच्या राज्यतील विद्वानांना नेहमी विचारत असे. पण त्याला काही समाधानकारक उत्तर मिळत नसे.


एकदा त्याने प्रधानाला बोलवून जवळच्या सर्व राज्यातील विद्वानांना बोलवून “कोणी धर्म समजून सांगू शकत असेल तर त्याने राजाला भेटायला यावे. जर राजाला समाधानकारक उत्तर मिळाले तर त्याचा योग्य सन्मान केला जाईल.” असे जाहीर केले.


वेगवेगळ्या राज्यातून अनेक विद्वान पंडित आले. प्रत्येकाने धर्माची व्याख्या वगैरे सांगितली. धर्म म्हणजे काय, हे उदाहरणाद्वारे सांगितले. पण राजाला समाधान होत नव्हते. काही तरी अपूर्ण आहे असे सारखे वाटत असे. बरेच जण येऊन गेले तरी त्याचे समाधान काही होईना. बरेच जण चूक काय , वाईट काय आणि बरोबर काय हे सांगत असत. दुसरा कसा चुकीचा यावर भर देत. त्यामुळे योग्य उत्तर काही मिळत नसे. शेवटी त्याने नाद सोडला.


त्याच्या राज्याच्या जवळील एका जंगलात एका ऋषींनी आश्रम बांधला आहे, अशी माहिती त्याला मिळाली. ते ऋषी खूप विद्वान आणि प्रकांडपंडित असल्याचेही त्याला कळले. माझ्या प्रश्नाचे उत्तर कदाचित ते देतील असा विचार करून तो त्यांच्या आश्रमात त्यांना भेटण्यासाठी गेला.


आश्रमात जाऊन ऋषीमुनींच्या पाया पडला. आशीर्वाद घेतले. ऋषीमुनिंसाठी आणलेला उपहार त्यांना देऊ केला. आणि मग “मला धर्म म्हणजे काय हे समजावून सांगाल का?” असा प्रश्न केला. ऋषीमुनींनी मिश्कील हास्य केले आणि त्याला म्हणाले “मी सुद्धा अजून त्याचे उत्तर शोधतोय, पण मी एवढ मात्र नक्की सांगेन की मी माझ्या जीवनात नेहमी धर्माने वागत आलो आहे.”


राजा म्हणाला “महाराज, जर तुम्ही नेहमी धर्माने वागत आला आहात असा तुम्हाला विश्वास आहे, तर मग तुम्हाला धर्म म्हणजे काय हे नक्की माहित असणार. कृपा करा आणि मला सांगा.”


ऋषींना राजाचा हट्ट खूपच भावला. त्यांनी त्याला सांगितले आज तू इथेच थांब. उद्या सकाळी मी तुला सांगतो धर्म काय आहे ते.”


दुसऱ्या दिवशी सकाळी भल्या पाहटे राजाला घेऊन ऋषीमुनी जवळच्या नदीवर गेले. नदीवर अनेक होड्या होत्या. नदीचे पात्र छोटेसे होते, आणि पाण्याचा प्रवाहसुद्धा संथ होता. ऋषींनी राजाला सांगितले, राजन चल आपल्याला नदीच्या पलीकडे जायचे आहे. मला सांग कुठल्या होडीने जायचे.


राजाने ऋषीमुनींना एका होडीजवळ नेले. ऋषीमुनींनी त्या होडीत अनेक दोष दाखवले आणि म्हणाले “राजा ही होडी नको. दुसरी बघ”


राजाने इतर होड्या बघितल्या आणि त्यातल्या त्यात चांगली होडी शोधली. ऋषीमुनींनी त्यातही चार पाच त्रुटी काढल्या आणि म्हणाले “नको रे बाबा, ही तर अगदीच वाईट आहे, आणखीन एक बघ,”


राजाने अजून एक होडी दाखवली. ऋषीमुनींनी त्यातले दोष दाखवले. चार पाच होड्या नाकारल्यावर राजा थोडा कंटाळला आणि ऋषीमुनींना म्हणाला, “महाराज, मला असे वाटते की नदीचे पात्र त्यामानाने फारच छोटे आहे. आणि प्रवाहही कमी आहे. आपण आरामात पोहून जाऊ शकतो. कशाला होडीची गरज?”


ऋषीमुनी हसले आणि राजाला म्हणाले. बरोबर बोललास राजन. धर्माचे असेच आहे. तू पोहायच ठरवल तर तुला पलीकडे जाता येईल. कशाला इतरांकडे धर्माची व्याख्या मागतोस. तू ज्या निष्ठेने आणि न्यायाने राज्यकारभार करतो आहेस त्यालाच धर्म म्हणतात. ज्याला धर्म सजायचा असेल त्याने धर्माने वागायला शिकले पाहिजे. धर्म हा अभ्यासाचा विषय नसून तो आमलात आणण्याचा विषय आहे. ज्या प्रमाणे तू आत्ता म्हणालास की नदी पार करण्यासाठी होडीची गरज नाही, आपण पोहून जाऊ शकतो, त्याच प्रमाणे धर्माचे आहे. सर्वेपि सुखिनः सन्तु , 

सर्वे सन्तु निरामया , 

सर्वे भद्राणि पश्यन्तु , 

मा कश्चित दुःख भाग्भवेत !!!, 


सर्व सुखी राहतील असे कार्य कर आणि दुर्बलांचे रक्षण कर. तुला धर्म काय हे कळल नाही तरी चालेल.”


राजाचे समाधान झाले आणि त्याने पुन्हा आपल्या राज्यात जाऊन योग्य प्रकारे राज्यकारभार चालवला, आणी धर्म म्हणजे काय याचे उत्तर शोधत बसण्यापेक्षा तो धर्म जगला.


English Moral Stories

Marathi Stories

Kishor Masik Goshti

Source - Google

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा