सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष २६ नोव्हेंबर

 

 दिनविशेष २६ नोव्हेंबर

दिनविशेष २६ नोव्हेंबर


महत्त्वाच्या घटना:

१८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.

१९४१: लेबेनॉन हा देश स्वतंत्र झाला.

१९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.

१९६०: भारतात सर्वप्रथम कानपूर आणि लखनो या दोन शहरांत आजच्या दिवशी मध्ये STD सेवा सुरु झाली होती.

१९६५: अ‍ॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.

१९६७: मध्ये लिस्बन शहरात ढगफुटी झाल्यामुळे ४५० लोकांना जीव गमवावा लागला होता.

१९८४: इराक आणि अमेरिका ने मध्ये राजनीतिक संबंध पुनर्स्थापित केले होते.

१९९०: मध्ये ब्रिटनची माजी प्रधानमंत्री मार्गारेट थॅचर यांनी त्यांचा राजीनामा ब्रिटन च्या राणीला सोपवला होता.

१९९२: मध्ये ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना त्यांच्या संपत्ती वर कर द्यावा लागेल हा नवीन निर्णय त्यांच्या संसद मध्ये घेण्यात आला होता.

१९९७: अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि पंतप्रधानांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर

१९९८: खाणा रेल्वे अपघातात २१२ जणांचा मृत्यू झाला.

१९९९: विकीरण जीवशास्त्र (Radiation Biology) या विषयात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.

२००६: ला इराक़ मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटामध्ये २०२ लोक मृत्युमुखी पडले होते.

२००८: मुंबई मध्ये ला दहशदवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता, त्यांनी मुंबई च्या ताज हॉटेल मध्ये घुसून अनेक लोकांना बंधक बनवले होते, पण त्यावर देशाच्या जवानांनी आणि पोलिसांनी चोख प्रतिउत्तर देत तीन दिवसात बंधकांना मोकळे केले होते.

२००८: पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना ’लष्कर-ए-तैय्यबा’ने मुंबईत ठिकठिकाणी अतिरेकी हल्ले केले.

२००८: मध्ये मुंबईला झालेल्या दहशदवादी हल्यात १६४ लोक मारले गेले होते आणि २५० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले होते.

२००८: महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.

२०१२: ला सिरीया मध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात १० मुले मृत्युमुखी पडले होते आणि १५ गंभीर जखमी झाले होते.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८९८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायन शास्रज्ञ कार्ल झीगलर यांचा जन्म.

१८८५: देवेन्द्र मोहन बोस – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २ जून १९७५)

१८९०: सुनीतिकुमार चटर्जी – आधुनिक ऐतिहासिक भाषाशास्त्र व ध्वनीविचार यांच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवणारे भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक (मृत्यू: २९ मे १९७७)

१९०२: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९७१)

१९०४: भारतीय कवि, विद्वान, लेखक, तत्वज्ञानी के. डी. सेठना यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०११)

१९१९: भारताचे प्रसिद्ध इतिहासकार शिक्षविद राम शरण शर्मा यांचा मध्ये जन्म.

१९२१: व्हर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील ’धवल क्रांती’चे जनक, ’अमूल’चे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२ – नडियाद, गुजराथ)

१९२२: अमेरिकेतील प्रसिद्ध व्यंगचित्रकार चार्ल्स एम. शुल्झ यांचा मध्ये जन्म.

१९२३: भारतीय सिनेमॅटोग्राफर व्ही. के. मूर्ति यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २०१४)

१९२३: राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर – चित्रपट दिग्दर्शक (बोलविता धनी, मी तुळस तुझ्या अंगणी, माझं घर माझी माणसं, घरचं झालं थोडं, गजगौरी, जख्मी) (मृत्यू: २८ जुलै १९७५ – मुंबई)

१९२४: भारतीय क्रिकेटपटू जसुभाई पटेल यांचा जन्म.

१९२६: कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म.

१९२६: महान शास्त्रज्ञ आणि शिक्षक यशपाल यांचा मध्ये जन्म.

१९२६: भारतीय राजकारणी रवी रे यांचा जन्म.

१९३८: ऑस्ट्रेलियन भौतिकशास्रज्ञ रॉडनी जोरी यांचा जन्म.

१९३९: टीना टर्नर – अमेरिकन/स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका

१९४९: पूर्व तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान मारी अल्कातीरी यांचा जन्म.

१९५४: वेल्लुपल्ली प्रभाकरन – एल. टी. टी. ई. चा संस्थापक (मृत्यू: १८ मे २००९)

१९६१: कोबरा बीयरचे सहसंस्थापक करण बिलिमोरिया यांचा जन्म.

१९७२: अर्जुन रामपाल – अभिनेता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा