दिनविशेष २७ नोव्हेंबर
महत्त्वाच्या घटना:
१०९५: मध्ये पोप अर्बन द्वितीय याने जगाला महायुद्धाचा धर्म उपदेश दिला.
१८१५: पोलंड राज्याच्या संविधान स्वीकारले गेले.
१८३९: बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे ’अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन’ची स्थापना
१९१२: अल्बानिया या देशाने मध्ये राष्ट्रीय ध्वज स्वीकारला.
१९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन ७० जण ठार झाले.
१९४९: मध्ये जबलपूर च्या नगरपालिकेमध्ये तेथील लोकांनी वर्गणी गोळा करून साहित्यिक सुभद्रा कुमारी यांचा पुतळा उभारला आणि त्या पुतळ्याचे अनावरण सुभद्रा कुमारी यांच्या लहानपणीची मैत्रीण कवियत्री महादेवी वर्मा यांच्या हातून करण्यात आले.
१९५३: ला अमेरिकी ड्रामा लेखक यूजीन ओ नील यांचा मृत्यू.
१९६६: दक्षिण अमेरिकेतील उरुग्वे नावाच्या देशाने ला संविधानाचा स्विकार केला होता.
१९८२: ला यासुहिरो नकासन हे जपान चे प्रधानमंत्री बनले होते.
१९९५: ला मिर वेनेजुएला जौकेलीन एग्वीलेरा मार्कानो नावाच्या महिलेला मिस वर्ल्ड चा पुरस्कार मिळाला होता.
१९९५: पाँडेचरीमधील ’व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर’ मधील शात्रज्ञांनी शोधलेले ’थोम्ब्रिनेज’ हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले. अमेरिकेने या औषधाचे पेटंट मंजूर केले.
१९९५: गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर
२०१६: निको रोसबर्ग २०१६ फोर्मुला १ चा चाम्पियान बनला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७०१: स्वीडिश खगोलशास्त्र व संशोधक अँडर्स सेल्सियस यांचा जन्म.
१८७०: दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस – इतिहास संशोधक (मृत्यू: ? ? ????)
१८७१: इटालियन भौतिकशास्रज्ञ जियोव्हानी जॉर्जी यांचा जन्म.
१८७८: भारतीय कवि आणि समीक्षक जतिंद्रमोहन बागची यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी १९४८)
१८८१: डॉ. काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ (मृत्यू: ४ ऑगस्ट १९३७)
१८८८: भारतीय लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळंकर यांचा जन्म.
१८९४: पॅनासोनिक चे संस्थापक कोनसुके मात्सुशिता यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १९८९)
१८५७: सर चार्ल्स शेरिंग्टन – मज्जापेशीवर संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९३२) ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ (मृत्यू: ४ मार्च १९५२ – इस्ट्बोर्न, ससेक्स, लंडन, इंग्लंड)
१८७४: चेम वाइझमॅन – इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९५२)
१९०३: नोबेल पारितोषिक विजेते नॉर्वेचे रसायनशास्त्रज्ञ लार्स ऑन्सेगर यांचा जन्म.
१९०७: हरिवंशराय बच्चन – हिन्दी कवी (मृत्यू: १८ जानेवारी २००३)
१९०९: रशियन गणितज्ञ अनातोली माल्त्सेव यांचा जन्म.
१९१५: दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – साहित्यिक, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ’फॉर हूम द बेल टोल्स‘ या कादंबरीचा ’घणघणतो घंटानाद’ हा त्यांनी केलेला अनुवाद उल्लेखनीय आहे. (मृत्यू: २९ जून १९८१)
१९४०: ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ (मृत्यू: २० जुलै १९७३)
१९५०: ला भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार अनिल धवन यांचा जन्म.
१९५२: भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते बॅप्पी लाहिरी यांचा जन्म.
१९८१: ला भारताचे प्रसिद्ध इतिहासकार आणि हिंदी साहित्यकार यांचा जन्म.
१९८६: सुरेश रैना – क्रिकेटपटू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा