दिनविशेष - २७ सप्टेंबर
सन १९०५ साली महान वैज्ञानिक अल्बर्ट आंइस्टीन(Albert Einstein) यांनी E= mc२ चा सिद्धांत सादर केला.
सन १९२५ साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.
सन १९५८ साली भारतीय जलतरण पटू मिहीर सेन हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई जलतरणपटू बनले.
सन १९८० साली युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन ने २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात केली.
जन्म :
सन १९०७ साली महान भारतीय क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्मदिन.
सन १९०७ साली भारतीय संगीत समीक्षक, संगीतशास्त्रज्ञ आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या विषयाचे प्रख्यात लेखक वामनराव देशपांडे यांचा जन्मदिन.
सन १९३२ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट दिग्दर्शक व निर्माता तसचं, यशराज फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती व वितरण कंपनीचे संस्थापक अध्यक्ष, यशराज चोप्रा यांचा जन्मदिन.
सन १९५३ साली भारतीय हिंदू अध्यात्मिक नेते, गुरू आणि मानवतावादी माता अमृतानंदमाया देवी यांचा जन्मदिन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा