सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

दिनविशेष - ६ सप्टेंबर

 दिनविशेष - ६ सप्टेंबर


१५२२: फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.

१८८८: चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम.

१९३९: दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

१९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.

१९६५: पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.

१९६६: दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.

१९६८: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.


जन्म :

१९२१: बार-कोड चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२)

१९२३: युगोस्लाव्हियाचे राजा पीटर (दुसरा) यांचा जन्म.

१९२९: हिंदी चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००४)

१९५७: पोर्तुगालचे पंतप्रधान जोशे सॉक्रेटिस यांचा जन्म.

१९६८: पाकिस्तानी फलंदाज सईद अन्वर यांचा जन्म.

१९७१: भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी यांचा जन्म. 


मृत्यू : 

१९३८: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक सली प्रुडहॉम यांचे निधन.

१९६३: कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८८३)

१९७२: जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार अल्लाउद्दीन खाँ यांचे निधन.

१९९०: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचे निधन. (जन्म: २३ जून १९१६)

२००७: इटालियन ऑपेरा गायक लुसियानो पाव्हारॉटी यांचे निधन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा