कपटी लांडग्याची फजिती
एक भुकेला लांडगा होता. तो शिकारीच्या शोधात निघाला असता त्याला एक धष्टपुष्ट गाढव दिसला. त्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो त्या गाढवाकडे गेला व गाढवाला म्हणाला, “गाढवराव मी नामवंत वैद्य आहे.
तुझी प्रकृती तपासून का? गाढवाने लांडग्याचा दुष्ट हेतू ओळखला व लांडग्याला म्हणाला, वैद्यराज माझी प्रकृती तशी उत्तम आहे. परंतु माझ्या उजव्या पायात काटा रुतला आहे. तेवढा काढा.
‘गाढव आपल्या बोलण्याने फसले’ या खुशीत तो लांडगा त्या गाढवाला मारण्याच्या उद्देशाने त्याच्या मागच्या पायाजवळ जाताच, गाढवाने अशा दोन-चार लाथा झाडल्या की, लांडग्याचे नाक व तोंड फुटून रक्तबंबाळ झाले. ते पाहून हुशार गाढव हसू लागला. जखमी लांडगा धूम पळत सुटला.
तात्पर्य : या जगात शेराला शव्वाशेर भेटतो. तेव्हा दुसऱ्याला कमजोर समजू नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा