सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, ३ एप्रिल, २०२२

महाराणीची कमाल

 महाराणीची कमाल 

एक रजपूत राजा होता. तो आपल्या दरबारात बसला होता. तेवढ्यात एक जादूगार दरबारात आला. त्याने दरबारात भली मोठी गाय उभी केली. आपल्या दोन्ही हातांनी ती उचलून दाखवली. राजा थक्क झाला व जादूगाराचे कौतुक करू लागला.


तिकडे जवळ बसलेली राणी म्हणाली, “त्यात काय विशेष, मीदेखील उचलून दाखवेन अशी एखादी गाय!” राजा म्हणाला, “काय गंमत करतेस की काय? तू एक स्त्री गाईला उचलणार? अगं जे मला शक्य नाही,


एका पहेलवानाला जे जमणार नाही, ते तू कसे काय करणार?” राणी म्हणाली, “बघा! ते मी करून दाखवते की नाही. मात्र मला सहा महिन्यांची मुदत हवी. त्यानंतर पाहा!” सहा महिने संपले.


पुन्हा दरबार भरला आणि एका लठ्ठ गायीला पुढे घेऊन आला. जो तो म्हणू लागला- ‘इतकी दांडगी गाय कशी उचलणार राणीसाहेब?’ पण खरोखरच राणीने आपल्या हातानी त्या गाईला उचलून घेतले.


राजाला आश्चर्य वाटले, अचंबित झाला. त्याने राणीला विचारले, “कसे काय जमवलेस सारे?” राणी म्हणाली, “अगदी सोपे आहे ते. मी फक्त एकच केले. ही गाय वासरू असल्यापासून तिला वर उचलायला सुरुवात केली. वासरू लहान असताना सोपे गेले नंतर प्रत्येक दिवशी त्याचे वजन वाढत गेले मी देखील त्याची सवय केली बस्स. जमलं शेवटी!”


तात्पर्य : सरावानं सर्व काही साध्य होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा