गर्वाचं घर खाली
वामन पंडित या विद्वान कवीला आपल्या ज्ञानाचा भलताच गर्व झाला होता. ते गावोगाव जात व तिथल्या विद्वानांना वादविवाद करण्याचे आव्हान देत आणि पराभूत करून त्यांच्याकडून अजिंक्यपत्रे मिळवीत.
एकदा वामन पंडित समर्थ रामदास स्वामीकडे गेले व त्यांना म्हणाले, “माझ्याशी वादविवाद करा, नाहीतर मला अजिंक्यपत्र द्या.” त्यावर समर्थ म्हणाले, “अगोदर माझ्या शिष्याचा पराभव करा आणि मगच माझ्याकडे या.”
शेवटी वामन पंडित समर्थांच्या कल्याण नावाच्या शिष्याकडे गेले असता शिष्य सुपाऱ्या मोजत होते. वामन पंडित आपल्याकडे कशाला आले याची कल्पना आलेल्या त्या शिष्याने शेजारी असलेल्या सुपाऱ्यांच्या राशीतून ओंजळभर सुपाऱ्या घेऊन पंडिताला विचारले,
“पंडित, माझ्या ओंजळीत किती सुपाऱ्या आहेत?” या अनपेक्षित प्रश्नाने वामन पंडित क्षणभर गोंधळून गेले व म्हणाले, “मला सांगता येत नाही. तुम्हाला सांगता येईल काय?” कल्याण म्हणाले, “माझ्या ओंजळीत ओंजळभर सुपाऱ्या आहेत.” या उत्तराने वामन पंडित निरुत्तर झाले. म्हणून वादविवादात जय मिळवितो तो पंडित नसून, जो विधायक कार्य करतो तोच खरा पंडित.
तात्पर्य : गर्वाचे घर खाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा