प्रामाणिकपणा
एका शेतकऱ्याने आपले शेत गणपत नावाच्या शेतकऱ्याला विकले. गणपतरावाने शेताच्या एका कोपऱ्यात विहिरीसाठी खोदकाम सुरू केले. असता खोदकाम सुरू केले असता खोदकामात सोन्याच्या मोहरा भरलेला भला मोठा हंडा मिळाला.
गणपतराव तो हंडा घेऊन ज्यांच्याकडून शेत विकत घेतले त्यांच्याकडे गेले व म्हणाले, मी तुमचे फक्त शेत विकत घेतले होते. मला सापडलेल्या मोहरांच्या हंड्याचा ‘खरा मालक’ तुम्हीच असल्यानं या हंड्याचा स्वीकार करा.
तेव्हा तो शेतकरी म्हणाला, हा काय न्याय झाला? अरे, ज्या अर्थी मी तुम्हाला शेत विकले तेव्हा त्यात जेजे मिळेल ते सर्व तुमचेच आहे. त्यामुळे तो हंडा घेण्याचा मला अधिकार नाही.
शेताचा पूर्वीचा मालक मोहराचा हंडा घेत नाही हे पाहून गणपतराव राजाकडे गेले व त्यांच्यापुढे आपली तक्रार मांडली. राजाने पूर्वीच्या शेतकऱ्याला बोलावून घेतले व दोघांचेही विचार ऐकून घेतले. दोघांचेही म्हणणे ऐकून घेतल्यावर, राजाने ते धन दोघांना वाटून दिले व त्यांच्या प्रामाणिकपणावर खूष होऊन, दोघांना भरपूर बक्षीस दिले.
तात्पर्य : प्रामाणिक व्हा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा