आधुनिक भारत (1885-1905)
माजी सनदी अधिकारी अॅलन हयूम यांनी तत्कालीन व्हाईसरॉय डफरीन यांच्या सहकार्याने 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची (काँग्रेसची) स्थापना केली.
मुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजच्या सभागृहात पहिले अधिवेशन भरले. देशाच्या विविध भागातून या अधिवेशनास 72 प्रतिनिधी उपस्थित राहिले.
डिसेंबर 1885 साली पुण्यात कॉलर्याची साथ आल्यामुळे नियोजित पुणे अधिवेशन मुंबईला भरले.
राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी
राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये न्या. महादेव गोविंद रानडे, पितामह दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, दिनशा वाच्छा, बेहरामजी मलबारी, रहिमतुल्ला सयानी, सर नारायण चंदावरकर, इ. महाराष्ट्रीय नेत्यांनी सहभाग घेतला होता.
1888 साली ‘ब्रिटिश समितीची’ स्थापना करण्यात आली. या समितीच्या वतीने ‘इंडिया’ नावाचे मासिक चालवून हिंदी लोकांच्या परिस्थितीचे सत्य वर्णन केले गेले.
1882 मध्ये दादाभाई ब्रिटिश पार्लमेंटच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ या सभागृहासाठी निवडून आले.
1895 मध्ये हिंदूस्थानातील खर्चाची चौकशी करण्यासाठी वेल्बी कमिशनची नेमणूक करण्यात आली.
1897 मध्ये पुण्यात चाफेकर बंधुनी प्लेग अधिकारी रॅड व आयर्स्ट यांची हत्या केली.
1899 मध्ये साम्राज्यवादी वृत्तीच्या लॉर्ड कर्झन याची ‘भारताचा व्हॉईसरॉय’ म्हणून नेमणूक झाली.
कर्झनने 1901 मध्ये ‘पंजाब लँड डेव्हलपमेंट कायदा’ पास करून कर्जबाजारी शेतकर्यांची कर्जे माफ केली.
1904 मध्ये ‘सहकारी पतपेढी कायदा’ करून शेतकर्यांना कर्जे मिळवण्याची सोय केली.
कृषी मार्गदर्शनासाठी 1901 मध्ये कर्झनने ‘इन्स्पेक्टर जनरल ऑफ अॅग्रीकल्चर’ नेमले.
1899 मध्ये पुसा येथे कर्झनने कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली.
1903 मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना झाली.
पोलीस व गुन्हेगरांचे संबंध तपासण्यासाठी कर्झनने अँड्रु फ्रेझर समिती नेमली. या समितीच्या शिफारशीनुसार कर्झनने संपूर्ण पोलीस खात्याचे पुनर्जीवन केले.
1901 मध्ये ‘Imperial cadet core’ ची स्थापना कर्झनने केली – (संस्थानिकांच्या राजपुत्रांकरिता)
कोलकत्ता येथे व्हिक्टोरिया राणीच्या स्मृती प्रित्यर्थ ‘व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल’ कर्झनने बांधला.
1900 मध्ये कोलकत्ता नगरपालिका कायदा करण्यात आला.
1904 मध्ये कर्झनने पुराणवस्तू संरक्षण खाते निर्माण करून भारताच्या संस्कृतीची जपवणूक केली.
सौजन्य : इंटरनेट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा