छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास
भारत देशानं आपल्या हृदयात अनेक विरपुत्रांच्या यशोगाथा कित्येक शतकांपासुन जतन केलेल्या आहेत हे विरपुत्र आपल्या पावन भुमीत जन्माला आले हे आपले केवढे सौभाग्य!
या महान विभुतींच्या विरगाथा ऐकतांना अंगावर रोमांच उभे राहातात आणि त्यांच्या काळात आपण जन्माला आलो असतो आणि त्यांच कर्तृत्व जर डोळयांनी पाहाता आले असते तर! असा विचार मनाला स्पर्शुन जातो . . . .
असे हे विर आणि अश्या त्यांच्या विरकथा . . . .
आपल्या महाराष्ट्रात असाच एक शक्तीशाली, निष्ठावान, पराक्रमी राजा होऊन गेला.
त्याच्या जन्माला येण्यानं आणि त्याच्या जाज्वल्य पराक्रमानं इतिहास घडवला आणि त्याचे नाव त्या पानांमधे सुवर्णाक्षरांनी कोरले गेले ते आज पर्यंत तसेच आहे आणि येणा.या काळात देखील तसेच जीवंत राहाणार आहे.
ते आहेत प्रौढ प्रताप पुरंदर . . . क्षत्रीय कुलावंतस् . . . सिंहासनाधिश्वर . . . . महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज!!!
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास –
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती –
शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव - शिवाजी शहाजी भोसले
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म - 19 फेब्रुवारी 1630
शिवाजी महाराज्यांच जन्मस्थळ - शिवनेरी किल्ला (पुणे)
शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक - 6 जुन 1674 रायगड
शिवाजी महाराजांच्या वडीलांचे नाव - शहाजीराजे मालोजी भोसले
शिवाजी महाराजांच्या आईचे नाव - जिजाबाई शहाजी भोसले
शिवाजी महाराजांच्या मुलांची नावे - संभाजी, राजाराम,सखुबाई,
रानुबाई, राजकुंवरबाई, दिपाबाई,
कमलाबाई, अंबिकाबाई.
शिवाजी महाराजांची उंची (Height)
५ फुट ६ इंच किंवा ५ फुट ७ इंच
(इंटरनेट वरील उपलब्ध माहिती नुसार)
शिवाजी महाराजांचे वजन - महाराजांच्या वजना विषयी कुठलीही ठोस माहिती उपलब्ध नाही.
शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव - भवानी तलवार , जगदंबा , तुळजा
शिवाजी महाराजांच्या तलवारीचे वजन - जवळपास १.१ ते १.२ कि. (११०० ते १२०० ग्राम)
शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव - मोती, इंद्रायणी, विश्वास, रणबीर, गजरा, तुरंगी आणि कृष्णा
शिवाजी महाराजांचा मृत्यु - ३ एप्रिल १६८० (वयाच्या ५० व्या वर्षी ) (3rd April 1680)
शिवाजी महाराजाचं मृत्यूस्थळ - किल्ले रायगड
शिवाजी महाराज किती वर्षे जगले ५० वर्ष, १ महिना, १४ दिवस
छत्रपती शिवाजी महाराज -
महाराज म्हणजे निश्चयाचा महामेरू . . . बहुतजनांसी आधारू . . . .अखंडस्थितीचा निर्धारू असे श्रीमंत योगी रयतेचा हा राजा . . . . . जाणता राजा ज्या शतकात जन्माला आला त्या इ.सन 1627 दरम्यान संपुर्ण भारतावर मुगलाचे अधिपत्य होते.
उत्तरेला शहाजहान, विजापुर ला आदिल शहा आणि गोवलकोंडयाला सुलतान कुतुब शहा यांचे शासन होते. समुद्र किनारे पोर्तृगिजांच्या ताब्यात होते.
आदिलशहाच्या सेनेत शहाजीराजे भोसले उच्च पदावर कार्यरत होते . . . . .शिवाजी महाराजांच्या जन्म १९ फेब्रुवारी 1630 ला जुन्नर जवळ शिवनेरी गडावर जिजाबाईंच्या पोटी महाराज जन्माला आले, शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे ’’शिवाजी’’ असे नामकरण करण्यात आले.
महाराजांना राज्यशासनाचे आणि युद्ध कौशल्याचे धडे राजमाता जिजाऊंकडून मिळाले. अगदी लहानपणापासून राम आणि कृष्णाच्या कथा ऐकून अन्याय आणि अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध त्यांच्या मनात चीड निर्माण झाली.
पहिली गुरू आईच्या संस्कारांमधे महाराजांचे बालपण अतिशय उत्तम रितीने गेले.
जिजाबाई महाराजांना राम कृष्णाच्या, शुरविरांच्या गोष्टी सांगुन त्यांच्यावर उत्तम संस्कार तर करतच होत्या त्या शिवाय तलवारबाजी, घोडयावर स्वार होणे यात त्यांना तरबेज करत होत्या.
मुघल साम्राज्य आपल्यावर करत असलेल्या अन्यायाची जाणीव त्यांना झाली. आणि या अत्याचारातून आपल्या जनतेला मुक्त करण्याचा वसा त्यांनी उचलला.
राजे छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ –
शहाजी भोसले- शिवाजी महाराजांचे वडील
राजमाता जिजाबाई – शिवाजी महाराज यांच्या आई
छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू –
राजे संभाजी शहाजी भोसले (सख्खे) (जिजाबाई)
राजे व्यंकोजी (एकोजी) शहाजी भोसले (सावत्र) (तुकाबाई)
संताजी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी –
सईबाई : संभाजी महाराज, राणूबाई, सखुबाई, अंबिकाबाई
सोयराबाई : राजाराम महाराज आणि दीपाबाई
पुतळाबाई
सकवारबाई : कमलाबाई
काशीबाई
सगुणाबाई : राजकुवरबाई
लक्ष्मीबाई
गुणवंताबाई
शिवाजी महाराजांचे मुले/मुली:
धर्मवीर छत्रपती संभाजी राजे – सईबाई पासून झालेला शिवाजी महराजांचा मुलगा.
छत्रपती राजाराम – सोयराबाई पासून झालेला शिवाजी महराजांचा मुलगा .
सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई – शिवाजी महाराज व सईबाई यांच्या ३ मुली.
दीपाबाई – सोयराबाई व शिवाजी महाराजांची मुलगी.
राजकुंवरबाई – सगुणाबाई व शिवाजी महाराजांची मुलगी.
कमलाबाई – सकवार बाई व शिवाजी महाराजांची मुलगी.
शिवाजी महाराजांची नातवंडे:
शाहू महाराज (सातारा)- राणी येसूबाई व छत्रपती संभाजी राजे यांचा मुलगा.
शिवाजी महाराज दुसरे (कोल्हापूर)- राणी ताराबाई व छत्रपती राजाराम यांचा मुलगा.
संभाजी महाराज – राणी राजसबाई व छत्रपती राजाराम यांचा मुलगा
शिवाजी महाराजांचे पंतू:
शिवाजी महाराज तिसरे
रामराजा
शिवाजी महाराज यांचे दैनंदिन जीवन –
महाराज आपल्या अष्टप्रधान मंडळाशी सल्लामसलत करून स्वराज्याशी संबंधित निर्णय व मोहिमांची आखणी करत होते. स्वराज्याच्या कारभाराचा मध्यबिंदू म्हणजे स्वराज्यातील प्रजा होती. न्याय निवाड्याची कामे विना भेदभाव केली जात होती. जनता असो वा मंत्री सर्वांसाठी सारखेच नियम होते.
आपल्या प्रजेचे मन महाराज ओळखत होते. प्रजेचे सुख-दुखः यांची जाणीव महाराजांना होती. म्हणूनच त्यांना जाणता राजा असे संबोधल्या जाते. महाराजांचे मावळे म्हणजे अठरापगड जातींतील लोक. त्यांनी कधी कुणाशी भेदभाव केला नाही. स्त्रियांचा सन्मान आणि त्यांची रक्षा हे आपले आद्य कर्तव्य असे महाराज मानत.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक –
अखेर तो दिवस उजाडला ज्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते . . . .6 जुन 1674 ला गागाभट्ठ यांनी हिंदु परंपरेनुसार अनेक ज्येष्ठांच्या आणि श्रेष्ठांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांना राज्याभिषेक केला . . . संपुर्ण रायगड त्या दिवशी एखाद्या नवरीसारखा सजवण्यात आला होता.
महाराज केवळ शुर आणि युध्द निपुणच नव्हते तर ते एक उत्तम प्रशासक देखील होते.
धर्माच्या नावाखाली त्यांनी कधीही कुणासोबत पक्षपात केला नाही . . .त्यांच्या दरबारातील काही अधिकारी आणि अंगरक्षक मुस्लिम देखील होते . . . त्यांनी कधीही कुठल्याही स्त्रिचा अनादर केला नाही इतकेच नाही तर युध्दात हरलेल्या शत्रुच्या स्त्रियांना देखील सन्मानपुर्वक परत पाठवत असत.
शिवाजी महाराज यांचे सिंहासन –
६ जून १६७४ रोजी छत्रपतींचा राज्याभिषेक रायगडावर पार पडला. यावेळी ३२ मन सुवर्ण सिंहासन घडविण्यात आले. राजे त्या सिंहासनावर विराजमान झाले. परंतु आता ते सिंहासन कुठे आहे याबद्दल कुठलीही ठोस माहिती सापडत नाही.
शिवाजी महाराजांचे कर्तबगार मित्र मंडळी तसेच मावळे –
महाराजांना अनेक कर्तबगार सैन्याची साथ मिळाली होती. यातील काही महाराजांचे बालपणापासूनचे मित्र तर काही त्यांच्या गुरुतुल्य होते.
दादोजी कोंडदेव
शिवा काशीद
बाजीप्रभू देशपांडे
येसाजी कंक
तानाजी मालुसरे
बहिरजी नाईक
सरनोबत नेताजी पालकर
हंबीरराव मोहिते
संभाजी कावजी
बाजी पासलकर
किंदाजी फरझंद
जीवा महाल
मुरारबाजी देशपांडे
गणोजी शिर्के
यांशिवाय अनेक मराठे महाराजांच्या साथीला होते.
शिवाजी महाराजांचे किल्ले –
साम्राज्याला स्थापीत करण्याकरता किल्यांचे काय महत्व आहे याची महाराजांना नेमकी जाण असल्यामुळे वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांनी तोरणा, चाकण आणि कोंढाणा किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतले.
आबाजी सोनदेवांच्या मदतीने मुल्ला अहमदच्या ताब्यात असलेले ठाणे, कल्याण आणि भिवंडीच्या किल्ल्यावर ताबा मिळवला.
यामुळे आदिलशाही साम्राज्याला हादरे बसु लागले . . . महाराजांवर लगाम लावण्याकरता त्यांच्या वडिलांना बंदी बनविण्यात आले . . . . पुढे जवळ जवळ 7 वर्ष महाराजांनी आदिलशहावर थेट आक्रमण केले नाही.
तो काळ त्यांनी त्यांची सेना (संख्याबळ) वाढवण्यात आणि इतरांसोबत संबध दृढ करण्यावर खर्च केला.
माहिती नुसार शिवाजी महाराजांनी सुमारे ३०० हून अधिक किल्ले जिंकलेले आहेत त्यापैकी शिवनेरी किल्ला, रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, राजगड, तोरणा, पन्हाळा, पुरंदर, लोहगड, सिंहगड, प्रबलगड, स्वर्णदुर्ग यां सारखे असंख्य किल्ले शिवाजी महाराजांनी स्वराज्याकरता जिंकले आहेत. आणि जवळपास महाराजांनी जवळपास १११ किल्ले बांधले होते, असा उल्लेख एका बखरी मध्ये आहे.
शिवाजी महाराजांची आणि अफजलखानाची भेट –
खूप प्रयत्न करूनही महाराज आदिलशहाच्या हाती सापडत नव्हते. शिवाजी महाराजांना कोण पकडणार असा सवाल दरबारात विचारण्यात आला. संपूर्ण दरबार गपगुमान झाला. महाराजांची कीर्ती सर्वज्ञात होती. आदिलशाहीचा कोणताही सरदार महाराजांचा सामोरे जाण्यास तयार नव्हता.
इतक्यात दरबारातून भक्कम हाक आली, “हम लायेंगे सिवाजी को पकड के”. हा पहाडी आवाज होता अफजल खानाचा. उंचबांधा, भक्कम शरीरयष्टी आणि युद्धकौशल असा हा सरदार.
शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्याकरता अफजलखान विजापुर वरून 10000 सैन्य घेऊन निघाला. अफजलखान धाडधिप्पाड शरिरयष्टीचा होता, महाराजांना डिवचण्याकरता त्याने रस्त्यात अनेक मंदिरे उध्वस्त केली, अनेक निरपराध लोकांचा बळी घेतला.
पण महाराजांनी आतातायी पणाने निर्णय न घेता त्याच्या सोबत छापामार पध्दतीने युध्द करत राहिले.
कंटाळुन अखेरीस अफजलखानाने महाराजांना मारून टाकण्याच्या इराद्याने भेटीचे आमंत्रण पाठवले. महाराजांनी सुरुवातीला त्याचा अस्वीकार केला. या मागे शत्रूला गाफील करण्याची युक्ती होती. महाराज भेटीचे नाकारत आहेत म्हणजे, ते घाबरले असा अर्थ अफजल खान काढेल हे महाराजांना ठाऊक होते. आणि तसेच झाले देखील.
पुन्हा पुन्हा अशी आमंत्रणे धाडण्यात आली. शेवटी महाराजांनी ते स्वीकारले. १० नोव्हेंबर १६५९ रोजी भेटीचा दिवस ठरला. खानच्या भेटीसाठी महाराज शामियान्यात दाखल झाले. भेटीचे आलिंगन देताना अफजल खानाने दगा केला. आपल्या बलदंड बाहुंमध्ये महाराजांना आवळण्याचा प्रयत्न त्याने केला. महाराजांच्या पाठीवर कट्यारीने हल्ला चढवला. महाराजांना याबद्दल पूर्व कल्पना होतीच.
राजांनी चिलखत घातलेले होते. त्यामुळे त्यांना काही झाले नाही. परंतु या नंतर जे घडले, ते इतिहासात याआधी कधी घडले नसावे. महाराजांनी वाघ नखांनी खानच्या पोटावर हल्ला केला. हल्ला असा होता कि अफजल खानाचे आतळेच बाहेर आले. आणि खान मरण पावला.
शिवाय महाराजांनी आपल्या लपलेल्या सैन्याला इशारा दिला आणि आदिलशहाच्या इतर फौजेला सुद्धा पराजित केले. इतिहासात हि घटना अफजल खानाचा वध किंवा प्रतापगडाचे युद्ध नावाने नमूद आहे.
औरंगजेबाच्या व्यवसायी केंद्रांवर आक्रमण:
1664 साली शिवाजी महाराजांनी मुघलांचे व्यवसायी केंद्र सुरतेवर आक्रमण करून त्याला नेस्तनाबुत केले यामुळे औरंगजेब प्रचंड चिडला आणि सेना नायक मिर्जा राजा जयसिंग ला दिड लाख सैन्यासोबत महाराजांवर आक्रमण करण्याकरता पाठवले या युध्दात शिवाजी महाराजांना हार पत्करावी लागली आणि त्यांना आपले 23 किल्ले आणि 4 लाख मुद्रा नुकसान भरपाई म्हणुन द्यावी लागली.
9 वर्षीय संभाजी ला घेउन महाराजांना औरंगजेबाच्या दरबारी आग्य्राला जावे लागले. महाराजांवर नियंत्रण ठेवण्याकरता सुरूवातीला त्यांना औरंगजेबाच्या दरबारात मोठे पद देण्याचे कबुल करण्यात आले पण प्रत्यक्ष तेथे पोहोचल्यानंतर महाराजांना मोगलांच्या दरबारी नजरकैद करण्यात आले त्यावेळी औरंगजेबाला माहिती देखील नव्हते की त्याची ही चुक त्याला चांगलीच महागात पडणार आहे.
मिठाईच्या पेटाऱ्यात बसुन त्यांनी आपली आणि बाळ संभाजीची सुटका करून घेतली मथुरा . . . काशी . . . गया. . . पुरी . . . गोलकोंडा . . विजापुर मार्गे ते रायगडावर पोहोचले . . . . .
पुढे महाराजांनी अनेक युध्द करत आपला बराच भाग मुघलांच्या ताब्यातुन परत मिळवला 1671 ते 1674 या काळात औरंगजेबाने शिवाजी महाराजांना परास्त करण्याचे बरेच प्रयत्न केलेत पण तो पुर्णतः असफल ठरला.
शिवाजी महाराजांचे निधन –
पुढे 3 एप्रील 1680 मधे (वयाच्या ५० व्या वर्षी) प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची तब्येत खालावत गेली आणि रायगडावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी –
शिवाजी महाराज यांची समाधी रायगडावर आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची गुण वैशिष्ट्ये –
आज्ञाधारी पुत्र: मासाहेब जिजाऊंची स्वराज्य स्थापनेची आज्ञा महाराजांनी पूर्ण केली.
जाणता राजा: महाराजांना आपल्या प्रजेची काळजी होती.
मुत्सद्दी राजकारणी
कुशाग्र बुद्धिमत्ता: महाराजांनी अनेक युद्धे ही गनिमी काव्याने जिंकली आहेत. ‘शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ’ ही म्हण येथे योग्य ठरते.
कुशल योद्धा: ते युद्धकलेत अत्यंत कुशल होते.
एकजुटीने कार्य करणे: महाराजांनी अनेक जाती धर्मातील लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केलेली आहे.
उत्तम प्रशासक
स्त्रियांचा सन्मान आणि रक्षा
द्रष्टा नेता
सर्वधर्म समभाव मानणारे राजे इ.
माहिती स्त्रोत : इंटरनेट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा