सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

सोमवार, ४ एप्रिल, २०२२

1857 च्या उठावानंतरचा काळ

 1857 च्या उठावानंतरचा काळ


भारताचा पहिला व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग झाला.

राणी एलिझाबेथच्या काळात स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीची 1857 साली राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत इतिश्री (शेवट) झाला.

इ.स. 1860 मध्ये भारतीय संस्थानिकांना कॅनिंगने सनदा दिल्या.

इ.स. 1861 साली प्रत्येक प्रांतात पोलिस खाते निर्माण करून त्यावर इंस्पेक्टर जनरल यापदाची निर्मिती करण्यात आली.

लॉर्ड मेकॉलेने तयार केलेल्या ‘इंडियन पिनल कोड’ ला 1860 मध्ये मान्यता देण्यात आली.

इ.स. 1861 मध्ये ‘इंडियन हायकोर्ट अॅक्ट’ पारीत केला गेला व त्यान्वये मुंबई, चेन्नई व कोलकात्ता या शहरात उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली.

‘चार्लस वुड’ ने सुचविलेल्या सुचनेनुसार लॉर्ड कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षणखाते सुरू केले. तसेच मुंबई, चेन्नई व कोलकात्ता येथे विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले.

इ.स. 1859 साली शेतकर्‍याविषयीचा ‘बंगाल रेंट अॅक्ट’ कॅनिंगच्या काळात करण्यात आला.

इ.स. 1860 मध्ये झालेल्या कृषक आंदोलनाच्या मूळ कारणांचे वर्णन ‘निल दर्पण’ या नाटकात केले. त्याचे इंग्रजी भाषांतर बंगालचा लेफ्टनंट ग्रांट याने केले.

लॉर्ड कॅनिंगची कारर्किर्द 1862 ला पूर्ण झाली. राणीने त्यास ‘अर्ल’ हा किताब बहाल केला.

इ.स. 1866-67 मध्ये ओरिसात दुष्काळ पडला होता त्याचे निर्मूलन करण्यासाठी ‘फॅमिना कमीशन’ ची नियुक्ती सर जॉन लॉरेन्स याने केली.

व्हाईसरॉय लॉर्ड मेयोने भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात केली.

14 डिसेंबर 1870 रोजी एक ठराव पास करून त्यानुसार वित्तविकेंद्रीकरणाची योजना निश्चित करण्यात आली. या ठरावास ‘प्रांतीय स्वायत्तेची सनद’ असे मानण्यात येते.

लॉर्ड मेयोच्या काळात इ.स. 1872 मध्ये शिरगणतीचे (जणगणना) कार्य सुरू झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा