सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, १ मार्च, २०२२

Daily Used 100 Sentences part 6

 


Daily Used 100 Sentences part ६ 

दररोज बोलली जाणारे 100 इंग्रजी वाक्य 

  Are you OK ? बरा आहेस का ? ठीक आहेस का ?

  Who am I ? मी कोण आहे ?

  No way ! शक्यच नाही !

  We waited. आम्ही वाट बघितली. आपण वाट बघितली.

  Take mine. माझे घे. माझा घे.

 They lost. ते हरले.

  Stop them. त्यांना थांबव. त्यांना थांबवा.

  I'm right. मी बरोबर आहे.

  She cried. ती रडली.

  He spoke. तो बोलला.

      See above. वर पहा. 

       Let us in. आम्हाला आत येऊ द्या. आम्हाला आत येऊ दे. 

       I'm awake. मी जागा आहे. मी जागी आहे. 

       I will go. मी जाईन. 

       I forgot it. मी ते विसरलो. मी ते विसरले. 

        Don't look . बघू नकोस . बघू नका. 

        He is nice. तो चांगला आहे. 

        I like tea. मला चहा आवडतो. 

       I was good. मी चांगला होतो. मी चांगली होते. 

       Is it time? वेळ आहे का

       How are you? तू कसा आहेस ? तू कशी आहेस ?

       Is he tall ? तो उंच आहे का ?

....        Is this it ?  हेच आहे का ? एवढच आहे का ?

....        Study hard. मेहनतीने अभ्यास कर. मेहनतीने अभ्यास करा.

....        Watch this. हे बघ. हे बघा.

....        Look again. परत बघ. परत बघा.

....        Who was it ?कोण होतं ?

....        Let me see. मला बघू दे. मला बघू द्या.

....        I exercised. मी व्यायाम केला.

....        He stood up. तो उभा राहिला.

....        He's married. तो विवाहित आहे.

...        Keep trying. प्रयत्न चालू ठेव. प्रयत्न चालू ठेवा. प्रयत्न करत राहा.

....        It was mine. ते माझं होतं.

....        I'm so full. माझं पोट अगदी भरून गेलं आहे.

....        I'm useless. मी बेकार आहे.मी निरुपयोगी आहे.

....        We can help. आम्ही मदत करू शकतो. आपण मदत करू शकतो.

....        Vote for me! मला मत द्या! मला मत दे!

....        Give me time. मला वेळ द्या. मला वेळ दे.

....        Who's going? कोण चाललंय?

....        Who took it? ते कोणी घेतलं?

....        They need me. त्यांना माझी गरज आहे.

...        Divya came in. दिव्या आत आली.

....        My eyes hurt. माझे डोळे दुखत आहेत.

....        We got ready. आम्ही तयार झालो. आपण तयार झालो.

....        Is it enough? पुरेसं आहे का?

....        Stop cursing. शिव्या देणं बंद कर. शिव्या देणं बंद करा.

....        We live here. आम्ही इथे राहतो. आपण इथे राहतो.

....        I can't move. मला हलता येत नाहीये. मी हलू शकत नाही.

....        I have proof. माझ्याकडे पुरावा आहे.

....        I can't come. मी येऊ शकत नाही.

....     I read a book. मी एक पुस्तक वाचलं.मी पुस्तक वाचले.

...      You're small. तू छाटा आहेस. तू छोटी आहेस. तुम्ही छोटे आहात.

....     Are they dead? ते मेले आहेत का?

....     I looked away. मी लक्ष्य वळवलं.

....     Who sent you? तुला कोणी पाठवलं? तुम्हाला कोणी पाठवलं?

....     He got caught. तो पकडला गेला.

....     He is a thief. तो चोर आहे. तो एक चोर आहे.

....      I became rich. मी श्रीमंत झालो. मी श्रीमंत झाले.

....     I didn't know. मला माहीत नव्हतं.

....     Who ran away? कोण पळून गेलं? कोण पळाला?

....    That was mine. ते माझे होते.

...      I saw someone. मला कुणीतरी दिसलं. मी कोणाला तरी पाहिलं.

....     I will listen. मी ऐकेन.

....     She helps him. ती त्याला मदत करते.

....     They're awake. ते जागे आहेत. त्या जाग्या आहेत.

....     Who does that? ते कोण करतं? तसं कोण करतं?

....     I'm so stupid. मी किती मूर्ख आहे.मी किती बावळट आहे.

....     Whose is this? हे कोणाचे आहे?

....     Are we leaving? आपण निघतोय का? आम्ही निघत आहोत का?

....     You were late. तुम्हाला उशीर झाला होता.

....     He's in danger. तो धोक्यात आहे.

...      Cows eat grass. गाई गवत खातात.

....     How is Ganesh now? गणेश आता कसा आहे?

....     I corrected it. मी ते दुरुस्त केलं. मी ते दुरुस्त केले.

....     Don't stand up. उभा राहू नकोस. उभी राहू नकोस.उभे राहू नका.

....      He seems tired. तो थकल्यासारखा दिसतोय.

....     I began to cry. मी रडायला सुरुवात केली.

....      He plays there. तो तिथे खेळतो.

....     Finish the job. काम संपव. काम संपवा.

....     Can we do that? आपण ते करू शकतो का? आम्ही ते करू शकतो का?

....    We'll fix that. आम्ही ते दुरुस्त करू. आपण ते दुरुस्त करू.

...     It's so simple. किती सोपं आहे.हे खूप सोपे आहे.

....     It is possible. ते शक्य आहे.

....     Let's try that. चला प्रयत्न करून बघूया.

....     This isn't new. हे काय नवीन नाही. हे नवीन नाही.

....     They came back. ते परत आले.

....     They have come. ते आले आहेत.

....     We worked hard. आम्ही खूप मेहनत केली. आपण खूप मेहनत केली.

....     Is lunch ready? जेवण तयार आहे का?

....     Where's my hat? माझी टोपी कोठे आहे?

....        Where's my mom? माझी आई कुठे आहे ?

...        He began to run. तो पळायला लागला. तो धावू लागला.

....        He has gone out. तो बाहेर गेला आहे.

....        Who called you? तुला कोणी बोलवले ?

....        Who wants what? कोणाला काय हवे आहे ?

....        Ask again later. नंतर पुन्हा विचारा. नंतर पुन्हा विचार.

....        I just got home. मी आत्ताच घरी आलो. मी आत्ताच घरी आले.

....        I have no money. माझ्याकडे पैसे नाहीत.

....        Why do you lie? तू खोटं का बोलतेस तू खोटं का बोलतोस ?

 

Part 5                                                   Part 7

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा